ठाकरेंच्या पाठोपाठ जानकरांनांही धक्का; पदाधिकाऱ्यांनी सांगितला पक्षावरच हक्क

Mahadev Jankar राज्यात पक्ष फुटीचे सत्र सुरुच आहे
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama

बारामती : राज्यात पक्ष फुटीचे सत्र सुरु आहे. शिवसेनेने (ShivSena) पाठोपाठ आता राष्ट्रीय समाज पक्षात (Rashtriya Samaj Party) देखील उभी फूट पडली आहे. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बारामती येथे आज बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या हुकुमशाही पद्धतीला कंटाळून त्यांची साथ सोडण्याचा निर्णय या पदाधिकाऱ्यांनी घेतला.

या बैठकीला तब्बल 22 जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय समाज पक्षामध्ये धुसपुस सुरू होती. आज झालेल्या बैठकीत ही खदखद बाहेर पडली. बारामती तालुक्यातील उंडवडी येथे झालेल्या एल्गार परिषदेमध्ये महादेव जानकर यांच्या विचारसरणीला बाजूला ठेवत कार्यकर्त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले.

Mahadev Jankar
भाजपच्या ताकदीवर मुख्यमंत्री लोकशाहीला न शोभणारे वक्तव्ये करतायेत

त्यामध्ये धनगर आरक्षणाचा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय धनगर समाजाचे प्रश्न यशवंत सेनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पक्षाचे नेतृत्व कार्यकर्त्यांना हीन वागणूक देत असल्याने त्यांना कंटाळून आम्ही त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला, असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

Mahadev Jankar
संवैधानिक नैतिकतेच्या कसोटीत शिंदे सरकार कोसळण्याची शक्यता : घटनातज्ज्ञांचे मत

राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि त्यागातून उभा राहिला आहे. त्यामुळे यापुढे पक्षावर आमचाच हक्क आहे. पक्षावर आमचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी कायदेशीर लढाई देखील लढण्याची तयारी असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेने प्रमाणेच पक्षाच्या अध्यक्षांना बाजूला ठेऊन पक्षावरच हक्क सांगितला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com