Pune By-Election : कसब्यातून काँग्रेस लढणार की निवडणूक बिनविरोध होऊ देणार?

Pune By-Election : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता
Congress and BJP
Congress and BJP Sarkarnama

Pune News : दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या जागांवर निवडणूक आयोगाने आज अचानकपणे पोटनिवडणूक जाहीर केली.

त्यामुळे येथे आता पोटनिवडणुका होणार आहेत. तर कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. कारण येथे काँग्रेसने पोटनिवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप विरूद्ध काँग्रेस असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत.

Congress and BJP
Chinchwad Assembly By-election : चिंचवडमध्ये जगतापांच्या कुटुंबातीलच असणार उमेदवार...

कसबा पेठ विधानसभा हा मतदारसंघ परपरांगत काँग्रेसच लढवत आला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombare) या लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनीच जाहीर केले होते. पण काँग्रेस ही जागा सोडण्याची सुतराम शक्यता नाही.

Congress and BJP
PCMC News : मविआ’ने डावलले पण भाजपकडून ‘डीपीडीसी’वर पिंपरी-चिंचवडला संधी

काँग्रेस (Congress) येथे आपला उमेदवार देणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. पण काँग्रेसकडून येथे उमेदवार कोण असणार? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप (BJP) असा सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. येत्या काही दिवसांत सविस्तर चित्र स्पष्ट होणार आहे.

Congress and BJP
Kasba Election : पोटनिवडणूक जाहीर; कसब्यातून रासने,घाटे की बीडकर ?

दरम्यान, भाजपच्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. या ठिकाणी आता निवडणुका लागल्या असून त्या बिनविरोध हेणार की नाही? हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

असा आहे पोटनिवडणूक कार्यक्रम?

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक येत्या २७ फेब्रुवारी २०२३ ला मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in