... तर जयंत पाटील यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार

राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा वाचवा
atul khupse.jpg
atul khupse.jpg

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याच्या निर्णयाला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्थगिती देऊन तो आदेश रद्द केला असल्याचे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. त्यांच्या घोषणेला चार दिवस उलटून गेले तरी याबाबत अजून कुठलाच अध्यादेश निघाला नाही. त्यामुळे या ठिकाणी देखील सोलापूरकरांची दिशाभूल होत असल्याचे जाणवत आहे. 25 मे पर्यंत हा निर्णय रद्द झाल्याचा अध्यादेश नाही निघाला तर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी दिला.(then there will be a agitation in front of Jayant Patil's house) 

22 एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील हक्काच्या उजनी जलाशयातील पाणी 'सांडपाणी' या गोंडस शब्दाचा वापर करून बारामतीकरांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळविले. या निर्णयाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नेते आक्रमक झाले आणि जिल्हाभर आंदोलनाचा भडका उडाला. शेतकऱ्यांच्या व शेतकरी नेत्यांच्या आक्रमकपणामुळे व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी भविष्यात पूर्णपणे नष्ट होईल या भीतीने बारामतीकरांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर इंदापूरला पाणी नेण्याचा आदेश रद्द केल्याचे सांगितले. मात्र, मंत्री जयंत पाटील यांनी ते वक्तव्य करून जवळपास चार दिवस उलटले आहेत. तरीही याबाबत कुठलाही शासकीय अध्यादेश निघाला नाही. ज्याप्रमाणे 'सांडपाणी' हा शब्द वापरून मुख्यमंत्र्याची दिशाभूल केली व सोलापूरकरांना वेड्यात काढण्याचा निरर्थक प्रयत्न केला त्याचप्रमाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची पिलावळ घेऊन माध्यमांसमोर व्हिडिओ देऊन पुन्हा एकदा दिशाभूल करू नका असा इशारा यावेळी खूपसे पाटलांनी दिला असून येत्या पाच २५ मे पर्यंत हा अध्यादेश निघाला नाही तर जयंत पाटील यांच्या निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला.

यावेळी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव माऊली हळणवर,कार्याध्यक्ष सुहास घोडके, उपाध्यक्ष बापु मेटकरी, सहसचिव किरण भांगे, संघटक माऊली जवळेकर, सरचिटणीस आण्णा जाधव, खजिनदार अभिजित पाटील, प्रवक्ता चिमणदादा साठे, सदस्य धनाजी गडदे, विठ्ठल मस्के, रुक्मिणी दोलतडे, बळीराम गायकवाड, आप्पासाहेब गवळी आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा वाचवा
उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी वळविण्याच्या निर्णय रद्द केल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्याच लोकांच समक्ष सांगितले आहे तीन दिवस झाले मात्र याबाबत कुठलाही शासकीय अध्यादेश निघाला नाही. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनी दोन दिवसात अध्यादेश न निघाल्यास राजीनामा देऊ, असे विधान एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा वाचवायचा असल्यास आणि पुन्हा पोटनिवडणूक लागू नये असे वाटत असल्यास बारामतीकरांनी यासंदर्भातला अध्यादेश ताबडतोब जारी करावा, अशी मागणी खुपसे यांनी केली.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com