...तर त्या ९० जागांच्या जोरावर बंगालमध्ये भाजपाची सत्ता आली असती

पश्‍चिम बंगालमधील यावेळची निवडणूक अविस्मरणीय अशी होती.
...तर त्या ९० जागांच्या जोरावर बंगालमध्ये भाजपाची सत्ता आली असती
dheeraj ghate.jpg

पुणे : पश्‍चिम बंगालमधील यावेळची निवडणूक अविस्मरणीय अशी होती.माझ्याकडे जबाबदारी असलेला कृष्णानगर उत्तर या मतदारसंघातून मुकुल रॉय हे तब्बल ३० हजार मतांची आघाडी घेऊन निवडून आले.बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळाले नसले तरी तीनवरून ७७ पर्यंत मारलेली मजल हे पक्षाने केलेले उत्तम नियोजन आणि तळातल्या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक कष्टाचे फलित आहे, अशी भावना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस व पुणे शहर प्रभारी धीरज घाटे यांनी व्यक्त केली.

घाटे यांनी पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला. सुमारे बावीस दिवस ते बंगालमध्ये होते. नाडिया जिल्ह्यातील कृषणानगर उत्तर या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पक्षाच्यावतीने देभरातील विशिष्ट कार्यकर्त्यांकडे अशाप्रकारे मतदारसंघांची जबाबदारी दिली होती. त्यात पुण्यातून घाटे यांचा समावेश होता. घाटे यांनी बावीस दिवसांच्या निवडणुकीतील प्रत्यक्ष अनुभव ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितला. ते म्हणाले, ‘‘ कृषणानगर हा मतदारसंघ कलकत्त्यापासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. या मतदारसंघातून मुकुल रॉय हे भाजपाचे उमेदवार होते. रॉय हे मूळचे तृणमल कॉंग्रेसचे.चार वर्षांपूर्वी ते भाजपात दाखल झाले.हा मतदारसंघ शहरी व ग्रामीण अशा स्वरूपाचा आहे. गरीबी मोठ्याप्रमाणात आहे. केंद्र सरकारच्या अनेक चांगल्या योजना इथल्या लोकांपर्यंत पोचलेल्या नाहीत. गेल्या सात वर्षात ममता बॅनर्जींच्या सरकारने केंद्र सरकारच्या गरीबांसाठी असलेल्या योजनांचा लाभ जनतेला मिळू दिला नाही हे तिथे फिरल्यानंतर जाणवले. बावीस दिवसात माझ्यासोबत काम केलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांना ममतांच्या सरकारने गेल्या पाच वर्षात मोठ्याप्रमाणात त्रास दिल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मी गेल्यापासून माझ्यासोबत असलेल्या माणिक सरकार या मंडल अध्यक्ष असलेल्या पदाधिकाऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून कालच जेलमध्ये टाकण्यात आले. खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे प्रकार इथे सर्रासपणे केले जातात. जोडीला हिंसाचार आहेच. गरीबी, निरक्षरता आणि राजकीय दहशत इथे मोठ्याप्रमाणात जाणवली.’’

घाटे म्हणाले, ‘‘ मी अनुभवलेल्या वातावरणानुसार बंगालमध्ये भाजपाला खूप चांगला प्रतिसाद होता. ७७ जागा निवडून आल्या असल्या तरी सुमारे ९० ठिकाणी तीन हजारांपेक्षा कमी फरकाने भाजपाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. कृष्णानगर मतदारसंघात कॉंग्रेस व कम्युनिस्टांचे अस्त्वितच जाणवले नाही. या दोन्ही पक्षांनी तृणमूल कॉंग्रेसला मदत केली नसती तर या ९० जागा अगदी सहजपणे भाजपाच्या पारड्यात पडल्या असत्या. परिणामी सत्तेचे पारडे भाजपाकडे आले असते.
Edited By : Umesh ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in