‘ईडी’च्या ताब्यात असलेल्या डीएसकेंच्या घरात चोरी

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणात ‘डीएसके’ यांना अटक झाल्यानंतर ईडीच्या कारवाईत हा बंगला जप्त करण्यात आला.
‘ईडी’च्या ताब्यात असलेल्या डीएसकेंच्या घरात चोरी
D.S. KulkarniSarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : अनेक गुंतवणुकदारांच्या फसवणूक प्रकरणात तुरूंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या सेनापती बापट रस्त्यावरील घरात चोरी झाली आहे.सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या या घरातील सहा लाख रूपयांच्या वस्तूंवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

चोरीची घटना 16 ऑक्टोबर 2019 ते 11 ऑक्टोबर 2021 दरम्यान घडली आहे.भाग्यश्री अमित कुलकर्णी यांनी या प्रकरणी पोलिंसाकडे फिर्याद दिली आहे. सेनापती बापट रस्त्यावर चतु:श्रृंगी मंदिराजवळ ४० हजार चौरस फुटांचा ‘डीएसके’ यांचा हा भव्य बंगला आहे. हा बंगला ‘ईडी’ने जप्त केला असून तेव्हापासून बंगला बंद अवस्थेत आहे.

D.S. Kulkarni
शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या ठेवी लवकरच मिळणार

चोरट्यांनी ‘सप्तश्रृंगी’ नावाने असलेल्या या बंगल्याचे सील तोडून आठ एलईडी टीव्ही, संगणक, 3 सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदीच्या वस्तू, कॅमेरा, पिठाची गिरणी या वस्तूंवर डल्ला मारला आहे.

D.S. Kulkarni
तळजाई जैववैविधता प्रकल्पाला मनसेचा विरोध; ठाकरे उतरणार मैदानात

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणात ‘डीएसके’ यांना अटक झाल्यानंतर ईडीच्या कारवाईत हा बंगला जप्त करण्यात आला. तेव्हापासून हा बंगला ईडीच्या ताब्यात आहे. त्यामुळे हा बंगला वापरात नव्हाता. घरातल्या अनेक वस्तू तशाच पडून आहेत. यापैकी वरील वस्तूंची चोरी झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून डीएसके तुरूंगात आहेत.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.