Pune News : कसब्याने पुण्यातील राजकीय गणित बदलणार; खडकवासल्यात तापकीरांचे टेन्शन वाढणार...

Bhimrao Tapkir News : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसने (Congress) दणदणीत विजय मिळवला.
Bhimrao Tapkir, Sachin Dodke News
Bhimrao Tapkir, Sachin Dodke NewsSarkarnama

Kasba by-election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसने (Congress) दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे महाविकास आघाडीचे मनोबल वाढले आहे. महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) एकत्र लढल्यास पुण्यातील राजकीय गणित बदलू शकतात. महानगरपालिकेच्या निवडणुकीसह अनेक विधानसभा मतदार संघातही याचा फटका भाजपला बसू शकतो, असे राजकीय जाणकार सांगतात.

यामध्ये खडकवासला विधानसभा मतदार संघातही महाविकास आघाडीच्या आशा पल्ल्वीत झाल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात भाजपचे (BJP) आमदार भीमराव तापकीर यांचा अवघ्या अडीच हजार मतांनी विजय झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सचिन दोडके यांचा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला होता.

Bhimrao Tapkir, Sachin Dodke News
Chandrasekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंना प्रदेशाध्यक्षपद लाभेना; सलग पराभवांमुळे डोकेदुखी वाढली?

या मतदार संघात त्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे अप्पा आखाडे यांना 5 हजार ९३१ मते मिळाली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग त्यानंतर शिवसेनेतील फूट आणि राज्यातील सत्तांतर यामुळे राजकारण बदलले आहे. भाजप-शिवसेना युतीने ताकदीने निवडणुका लढल्या होत्या. मात्र, आता शिवसेनेत फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळणार आहे.

उद्धव ठाकरे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आहे. त्यातच राज्यात नव्यानेच भिमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रयोग झाला आहे. त्या माध्यातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आले आहेत. आंबेडकर यांना महाविकास आघाडीत आण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आघाडीत आल्यास खडकवासल्याचे गणित बदलणार आहे. त्यातच आघाडीसोबत उद्धव ठाकरे आहेत. यामुळे भाजपला या मतदार संघात मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Bhimrao Tapkir, Sachin Dodke News
Sharad Pawar : धंगेकरांच्या यशाची मलाच खात्री नव्हती: कसब्याच्या विजयावर शरद पवारांनाच होती शंका

तापकीर अवघ्या अडीच हजार मतांनी निवडून आले होते. त्यामध्ये वंचितच्या उमेदवाराने जवळपास सहा हजार मते घेतली होती. तेव्हा शिवसेनाही पूर्ण ताकदीने तापकीरांच्या सोबत होती. आता धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचे नाव जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले असले तरी सुद्धा पुण्यातील आणि खडकवासला मतदार संघातील शिवसैनिक तुलनेने उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे तापकीर यांचे विजयाचे गणित बिघडू शकते. कसब्याच्या विजयामुळे आघाडीच्या आशा पल्ल्वीत झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com