राज्य सरकारची दोन वर्षे विकासाची नव्हे तर विनाशाची

महाविनाश आघाडी सरकारच्या संकटातून सुटका कधी होणार अशा प्रतिक्षेत जनता आहे.
राज्य सरकारची दोन वर्षे विकासाची नव्हे तर विनाशाची
विनय सहस्त्रबुद्धे सरकारनामा

पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे म्हणजे विकासाची नव्हे तर विनाशाची दोन वर्षे असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज केली.दोन वर्षांपूर्वी अचानकपणे आपत्ती कोसळावी त्याप्रमाणे हे सरकार महाराष्ट्रतील जनतेवर कोसळले. या सरकारने राज्यातील सामान्य माणसाची फसवणूक केली असून लोकांचा पाठिंबा नसलेल्या या सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताच नैतिक आधिकार नसल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

 विनय सहस्त्रबुद्धे
राज्यातील दंगलीची चौकशी निवृत्त न्यायमूर्तीमार्फत व्हावी

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना खासदार सहस्त्रबुद्धे यांनी गेल्या दोन वर्षात राज्य सरकारच्या कामाच्या पद्धतीवर जोरदार टीका केली. चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत, विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्य, कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी सरकारचा निर्णय आदी प्रश्‍नांना उत्तरे देण्यास त्यांनी नकार दिला. तर हे सरकार खऱ्या अर्थाने उभे नाही. त्यामुळे या सरकारला पाडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही, असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर दिले.

 विनय सहस्त्रबुद्धे
नरेंद्र पाटील म्हणतात; ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी

खासदार सहस्त्रबुद्धे म्हणाले,‘‘ महाविनाश आघाडी सरकारच्या संकटातून सुटका कधी होणार अशा प्रतिक्षेत जनता आहे. सरकार स्थापन करताना विविध आश्‍वासन देण्यात आली. अचानक एकत्र आल्यामुळे जनतेसमोर काही तरी कार्यक्रम घेऊन गेले पाहिजे, म्हणून किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला. परंतु त्याच्याशी आघाडीतील कोण्यातही पक्षाची बांधिलकी नाही. तळागळातील जनता सोडा, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यापर्यंतदेखील हा कार्यक्रम पोचलेला नाही. दिलेले आश्‍वासन एक आणि प्रत्यक्षात कार्यपद्धती यामध्ये मोठी विसंगती आहे. कायदा सुव्यवस्था, शिक्षण, रोजगार सगळ्याच पातळ्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. आघाडीत प्रचंड गोंधळ आहे. एकवाक्यता नाही. या सरकारचा कामकाज महाराष्टाच्या लौकिकाला साजेसा नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून राज्य सरकारचा नार्कतेपणा समोर आला आहे.’’

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in