Transfers Of Police Officer: राज्य सरकारचा बदल्यांतील घोळ कायम, तीन एसीपीं'च्या बदल्या दोन दिवसांत रद्द, नऊंच्या बदलीत बदल

Pune Police : गेल्यावर्षी महाराष्ट्रात सत्ताबदल होताच नव्या सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला.
Transfers Of Police Officer:
Transfers Of Police Officer: Sarkarnama

DYSP Transfer :  गेल्यावर्षी महाराष्ट्रात सत्ताबदल होताच नव्या सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला. मात्र, त्या विचारपूर्वक न केल्याने त्यातील घोळही लगेच समोर आला. कारण त्यापैकी अनेकांच्या बदल्यांत नंतर बदल करण्यात आला. काही रद्दच झाल्या.तर, अनेकांना बदलीनंतर कित्येक दिवस नियुक्तीच देण्यात आलेली नव्हती. (The transfers of three ACPs were canceled within two days, while the transfers of nine were changed)

Transfers Of Police Officer:
Pune Vetal Tekdi : आमदार शिरोळे म्हणतात स्थगिती दिली; मनपाकडून मात्र वेताळ टेकडी रस्त्याची चाचपणी?

हा बदल्यांतील घोळात घोळ शिंदे-फडणवीस सरकारला दहा महिने पूर्ण झाल्यानंतरही कायम राहिला आहे. २२ मे रोजी राज्य सरकारने डीवायएसपीं'च्या (ACP) बदल्या केल्या होत्या.त्यात ४८ तासांत काल बदल करण्यात आला.तीन रद्द केल्या गेल्या. नऊमध्ये बदल करण्यात आला.म्हणजे त्या फिरविण्यात आल्या.दोघांना दिलेल्या नियुक्त्या रद्द केल्या गेल्या.परिणामी आणखी तिघांना हकनाक बदलीला सामोरे जावे लागले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील तीन एसीपींच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.त्यात चाकण विभागाच्या प्रेरणा कट्टे यांची नक्षलग्रस्त चंद्रपूर जिल्ह्यात चिमूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) म्हणून ती केली गेली होती.ती काल गृह विभागाने रद्द केली.त्यासह दिनेशकुमार कोल्हे आणि संजय सावंत यांच्याही बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.  (Police Transfer)

Transfers Of Police Officer:
Pune Traffic Police: पुणेकरांनो सावधान, ...तर तुमचा वाहन परवाना निलंबित होऊ शकतो!

कोल्हे यांची सिल्लोड,तर सावंत यांची शेवगांव येथे एसडीपीओ म्हणून बदली झाली होती.निलेश देशमुख आणि अश्विनी शेंडगे यांच्या नियुक्त्याही रद्द केल्या गेल्या आहेत.देशमुख यांची एसीपी,नागपूर,तर शेंडगे यांची दहिवडीचे एसडीपीओ म्हणून नियुक्ती झाली होती.तर, बदलीत बदल झालेल्यांत सुनील पाटील, धनजंय पाटील,विक्रांत गायकवाड,विक्रम कदम,रणजित पाटील,गजानन टोम्पे आदी पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Maharashtra Police)

दरम्यान,एसीपी कट्टे यांच्या बदलीमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक किशोर आवारे यांच्या खूनाच्या तपासात आलेला अडथळा आता ही बदली रद्द झाल्यामुळे दूर झाला आहे. कारण आवारे खूनाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) त्या प्रमुख आहेत.

Transfers Of Police Officer:
Pune Police News : राजकीय नेत्यांमार्फत फिल्डिंग लावली; तरीही बदली नाही झाली : काहींची धावपळ वाया

स्थानिक एसीपी पद्ममाकर घनवट यांना डावलून त्यांच्याकडे हे प्रमुखपद देण्यात आलेले आहे. पुणे जिल्ह्यात खळबळ उडवून दिलेल्या आवारेंच्या राजकीय खूनाने मावळ तालुक्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मावळात व त्यातही तळेगाव दाभाडे परिसरातील खूनांमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये असलेले गुन्हा शाखा युनीट कार्यालय आता तळेगावात हलविण्यात आले आहे.आवारे खूनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक आमदार आरोपी आहेत.त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे हा तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यात अडथळा येऊ नये म्हणून कट्टे यांची बदली रद्द करण्यात आल्याचे समजते.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com