शिक्षकानेच काढली विद्यार्थिनींची छेड; संबंधित शिक्षक राजकीय पक्षाचा पदाधिकारी

हा शिक्षक गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलींची छेडछाड करीत असल्याचा धक्कादायक प्रकार शाळेत घडत होता.
Crime
Crime Sarkarnama

पुणे : इंदापूर (Indapur) तालुक्याच्या पश्‍चिम भागातील एका माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाने (Teacher) अकरा अल्पवयीन विद्यार्थिनींना (Student) छेडछाड (बॅड टच) करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकराची परीसरामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. संबंधित शिक्षक एका प्रमुख राजकीय पक्षाचा इंदापूर तालुक्याचा उपाध्यक्ष असल्याने एकच खळबळ उडाली आहे. (The teacher teased the girls)

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील एका नामांकित विद्यायलयामध्ये हा शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. हा शिक्षक गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलींची छेडछाड करीत असल्याचा धक्कादायक प्रकार शाळेत घडत होता. मात्र भीतीपोटी अल्पवयीन मुली तक्रार करण्यास टाळाटाळ करीत होत्या. गेल्या १५ दिवसांपूर्वी शिक्षकाने शाळेतील सुमारे ११ मुलींना बॅड टच केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याची चर्चा परिसरामध्ये दबक्या आवाजात सुरु आहे. संबंधित मुलींनी शाळेतील महिला शिक्षक व शाळेच्या प्राचार्याकडे हा प्रकार सांगितल्याने शाळेने संबंधित शिक्षकाला निलंबित केले आहे.

Crime
राजकारणातील माझा साथीदार इतक्या लवकर सोडून जाईल, असे वाटले नव्हते : अजितदादांनी जागवल्या कार्यकर्त्याच्या आठवणी

यासंदर्भात शाळेच्या प्राचार्यानी वालचंदनगर पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाच्या विरोधात तक्रारी अर्ज दिला आहे. पोलिसांनी अर्ज आला असल्याचेही सांंगितले आहे. संबंधित शिक्षक एका राजकीय पक्षाचा इंदापूर तालुक्याचा वरिष्ठ उपाध्यक्ष असून सध्या तो राजकारणामध्ये सक्रिय आहे.

Crime
लहान भाऊ पोहायला शिकला अन्‌ मला रात्रभर झोपच लागली नाही : अजितदादांची तुफान फटकेबाजी

गुन्हा दडपण्याची शक्यता

संबंधित शिक्षक राजकीय पदाधिकारी असल्यामुळे राजकीय वजन वापरून हा प्रकार दडपण्याची शक्यता आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे.

Crime
MCA Election : नार्वेकरांनी घेतली दुसऱ्या क्रमांकाची मते; विजयानंतर उद्धव ठाकरेंचा फोन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com