Devendra Fadnavis News :''माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न; पण तो चक्रव्यूव्ह भेदून मी बाहेर आलो''

Pune News : उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पुन्हा पुण्यात केलेले विधान चर्चेत
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Politics : पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या वक्तव्यावर गेल्या चार दिवसांपासून राज्यातील राजकारण फिरत आहे. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली होती.

त्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही या विषयात मते व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पुन्हा पुण्यात केलेले विधान चर्चेचे ठरले.

तीन वर्षांपूर्वी सरकार बनू नये यासाठी काही नेत्यांनी प्रयत्न केले. त्यात ते काही काळ यशस्वी झाले. मात्र, त्यांना फार काळ यशस्वी होता आले नाही. आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्नही केला. माझ्यासाठी चक्रव्यूव्ह तयार केला होता. मात्र, तो चक्रव्यूव्ह भेदून मी बाहेर आलो. मी जे काही बोललो ते शंभर टक्के खरे आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Chinchwad By Election : राज ठाकरे मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिले; पाठिंब्यानंतर अश्विनी जगतापांची भावना

ज्या काळात मी बोललो त्या काळातील माझ्या पत्रकार परिषदा पाहा. मी काय बोललो ते शांतपणे ऐका म्हणजे एक-एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. मी जे बोललो ते वस्तुस्थितीला धरून आहे. त्यात चुकीचे काहीच नाही. सर्व घटना-घडामोडी जोडून पाहिल्या तर अनेक गोष्टी तुमच्या लक्षात येतील, असे फडणवीस यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींना सांगितले.

Devendra Fadnavis
Bhagatsingh Koshyari : 'कोश्यारींनी ठाकरे परिवाराशी जुळवून घेण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला!'

मी जे काही बोललो ते आज आवश्‍यक होते तेच बोललो आहे. जे घडले त्यातील अर्धेच मी बोललो आहे. उरलेले योग्य वेळ आली की नक्की बोलेन, असेही फडणवीस यांनी बजावले. त्यामुळे घडलेल्या नाट्याचा अर्धाच भाग फडणवीस यांनी सांगितला पूर्ण भाग काय असेल याची उत्सुकता राजकीय कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे.

Devendra Fadnavis
Jitendra Awhad News : आव्हाड समर्थकांकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण

तीन वर्षापूर्वी अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करताना नेमके काय झाले. याची पूर्ण माहिती फडणवीस यांच्याकडे आहे. त्याचा योग्य वापर सध्या ते करताना दिसत आहेत. या विषयात अजित पवार काही बोलू शकले तर मी सविस्तर बोलेन, असे चार दिवसांर्वूी त्यांनी स्पष्ट केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या साऱ्याची कल्पना होती. त्यातूनच पहाटेचा शपथविधी झाल्याचा दावा फडणवीस यांनी केल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून या विषयावरून राजकीय हलकल्लोळ सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com