राज्य सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; मराठा मुलांच्या सवलती थांबवल्या

गेल्या अडीच वर्षात राज्य सरकारने कोणतेच भरीव काम केलेले नाही.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

पुणे : गेल्या अडीच वर्षात राज्य सरकारने (State Government) कोणतेच भरीव काम केलेले नाही. ओबीसींचे आरक्षण घालवून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. मराठा मुलांसाठी फडणवीस सरकारने दिलेल्या अनेक सवलती बंद केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज केला.

Chandrakant Patil
भोंग्यांविरोधात जनजागृतीसाठी पुणे मनसेची उद्यापासून स्वाक्षरी मोहीम

पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘ ओबीसींचे आरक्षण घालवून बसलेल्या या सरकारने पुन्हा आरक्षण मिळविण्यासाठीदेखील ठोस काम केलेले नाही. गेल्या वर्षभरात ‘इम्पिरिकल डाटा’ मिळविण्यासाठी या सरकारने ठोस प्रयत्न केलेले नाहीत. फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील मराठा समाजाच्या मुलांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या होत्या.’’

Chandrakant Patil
छोटा पाकिस्तान' व्हिडिओ व्हायरल; मुख्यमंत्री बोम्मईंनी दिला कारवाईचा इशारा...

पाटील म्हणाले, ‘‘ व्यावसायिक शिक्षणातील निम्मे शुल्क भरण्याचे या सरकारने बंद केले. मराठा समाजाच्या मुलांसाठीची वसतिगृहाची योजना थांबविण्यात आली. उच्च शिक्षणासाठी कर्ज योजना या सरकारने गुंडाळी आहे. ‘सारथी’सारखी महत्वाची संस्था आमच्या काळात सुरू केली. मराठा समाजाच्या मुलांसाठी असलेली ही महत्वपूर्ण संस्थेचे काम थंडावले आहे. हे सारे पाप या सरकारने केले असून ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाची राज्य सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या काळात केवळ फसवणूक केली आहे.’’

केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यात एका कार्यक्रमात बोलताना ब्राम्हण मुख्यमंत्री झाल्याचे पाहायचे आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, ‘‘ भारतीय जनता पार्टीत जात पाहून कुणालाही पदे दिली जात नाहीत. आमच्या पक्षात गुणत्ता हीच महत्वाची असते. त्यामुळे भाजपा जातीवर चालणारा पक्ष नाही.’’

मुख्यमंत्रीपदाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर विचारले असता, पाटील म्हणाले, ‘‘ अजित पवार यांनी बोलताना केवळ उदाहरण दिले आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याची आवश्‍यकता नाही. ज्याचे बहुमत असेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल हे कुणी सांगण्याची गरज नाही, हेच पवार यांनी स्पष्ट केले आहे.’’

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com