PCMC : शिंदे सरकारने आपलाच आदेश फिरवत महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केली रद्द

PCMC : टाटा मोटर्स कंपनीला थकित मालमत्ता करापोटी झगडे यांनी नोटीस काढल्याने त्या वादात सापडल्या होत्या
PCMC News
PCMC NewsSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची मुदतपूर्व बदली या महिन्यात (ता.१३ सप्टेंबर) राज्य सरकारने केली होती. त्यांच्या जागी सरकारने नियुक्ती केलेल्या पिंपरी पालिकेतीलच उपायुक्त स्मिता झगडे (एलबीटी आणि सुरक्षा) यांना आठवड्यानंतरही पदभार देण्यात आला नव्हता. आता, तर त्यांची ही नेमणूकच राज्याच्या नगरविकास विभागाने आज (ता.२२ सप्टेंबर) अचानक रद्द केली. तसेच ढाकणे यांच्या जागी वसई-विरार पालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या नेमणुकीचे आदेश तडकाफडकी काढले. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा पालिकेसह शहरातही सुरु झाली आहे. (PCMC News)

PCMC News
खासदार,आमदारांसह पक्षही निसटल्याने ठाकरे अस्वस्थ...

शहरातील एका लोकप्रतिनिधींचा झगडे यांच्या अतिरिक्त आय़ुक्त पदावरील नियुक्तीला विरोध होता. त्यातून तसेच आपल्या मर्जीतील अधिकारी यावा म्हणून त्यांची ही नेमणूक रद्द करण्यात आल्याचे समजते. त्यांना पालिकेतच उपायुक्तपदी जुन्या ठिकाणी कायम ठेवण्यात आले आहे. ढाकणेंची भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतून पिंपरी पालिकेत गेल्यावर्षी १२ फेब्रुवारीला प्रतिनियुक्तीवर पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली होती. आता त्यांची बदली पुन्हा त्यांच्या मूळ विभागात करण्यात आली होती. मात्र,अद्याप त्यांनी पदभार सोडला नव्हता. तर, नियुक्ती मिळूनही झगडे यांना तो देण्यात आला नव्हता. करसंकलन विभागात असताना टाटा मोटर्स कंपनीला थकित मालमत्ता करापोटी झगडे यांनी नोटीस काढल्याने त्या वादात सापडल्या होत्या. त्यावरून भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका करीत त्यांना पुन्हा राज्य सरकारच्या सेवेत पाठविण्याची मागणी केली होती.

PCMC News
अर्थमंत्री मॅडम...आम्हाला न्याय द्या; 'रूपी'च्या कर्मचाऱ्यांचे साकडे...

राज्यात सत्ताबदल होताच पिंपरी पालिकेतही आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर मोठे बदल होऊ लागले आहेत. कार्यक्षम धडाकेबाज आयुक्त राजेश पाटील यांच्या गेल्या महिन्यात (ता.१६ सप्टेंबर) मुदतपूर्व बदली झाली. त्यानंतर ढाकणे यांचीही ती होणार असल्याची चर्चा त्यावेळीच रंगली होती. ती महिन्याभरातच खरी ठरली. कारण या दोघांनाही महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात आणले होते. म्हणून सत्ताबदल होताच प्रथम त्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यातून अजित पवार यांना काही अंशी शह देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शहर भाजपने या दोघांच्या कारभाराविरोधात राज्य सरकारकडे तक्रारी केल्या होत्या.

PCMC News
डोळे काढेन.. म्हणता एवढी हिंमत आहे का तुमच्यात?; पेडणेकरांचं राणेंना आव्हान

ढाकणेंप्रमाणे जांभळेंचीही पिंपरीतील बदली ही प्रतिनियुक्तीवरच आहे. ते मूळचे राज्य कर विभागातील आहेत. पण, त्यांची वसई-विरार महापालिकेत प्रतिनियुक्तीवर उपायुक्त म्हणून बदली झाली होती. तेथून ते पुन्हा प्रतिनियुक्तीवरच पिंपरीत आले आहेत. येथील त्यांचा कार्यकाळ हा दोन वर्षाचा असल्याचे त्यांच्या बदली आदेशात नगरविकास विभागाच्या सहसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in