शिंदे गटाकडून पश्‍चिम महाराष्ट्रात ठाकरेंना मोठा धक्का देण्याची तयारी; पुण्यात लवकरच मेळावा !

मेळाव्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) पाच जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक आपल्या गटात सामावून घेण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे.
Eknath shinde-Uddhav Thackeray
Eknath shinde-Uddhav Thackeraysarkarnama

पुणे : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Chief Minister Eknath Shinde) झाल्यानंतर ठाणे-मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यातून पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि आता खासदारदेखील शिंदे गटात सहभागी होत आहेत. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी पश्‍चिम महाराष्ट्रावर (Western Maharashtra) विशेष लक्ष देण्याची योजना आखली आहे. येत्या काही दिवसात पुण्यात मेळावा होणार आहे. या मेळाव्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक आपल्या गटात सामावून घेण्याची तयारी सुरू केली आहे.

Eknath shinde-Uddhav Thackeray
महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता ‘चुल्लूभर’ पाण्यात बुडून मरावे !

पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसात अनेकजणांनी मुख्यमंत्री शिंदे गटाची वाट धरली आहे. मात्र, येत्या काही दिवसात यापेक्षाही मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ पुणे नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून येणारा प्रतिसाद मोठा आहे. त्यामुळे पाहता येत्या काही दिवसात पुण्यात एक मोठा मेळावा घेऊन पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात प्रवेश देऊन शिवसेनेला मोठा धक्का देण्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

Eknath shinde-Uddhav Thackeray
शिवसेना सोडायची तर मर्दासारखी सोडा, रडून सोडू नका

शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी मंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शरद सोनवणे, शहर सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे, युवासेनेचे किरण साळी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात गेल्या चार दिवसात प्रवेश केला आहे. पक्षांतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसात शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची ही काही मोजकी नावे आहेत. मात्र, या पुढच्या काळात शिवसेनेतल्या शहर आणि जिल्हा पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Eknath shinde-Uddhav Thackeray
राहुल कुल, गोरेंनी फसवणुकीचा डाव ओळखला अन् फडणवीसांनी उधळून लावला!

पश्‍चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातून सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, तसेच शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांड्याचे आमदार तानाजी सावंत, यांच्यासह अनेकांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. आमदार सावंत भूम-परांड्यातून निवडून आले असले तरी ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मूळ रहिवासी आहेत. शिवसेनेची सोलापूर जिल्ह्याची जबाबदारीदेखील काही काळ आमदार सावंत यांच्याकडे होती. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, खासदार हर्षवर्धन माने तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने शिंदे गटात सहभागी झाली आहे.

शिंदे गटाकडे सुरू असलेला ओघ पाहता या पुढच्या काळात पश्‍चिम महाराष्ट्रात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच प्रमुख नेते शिवसेनेत उरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आता जे शिवसेनेत आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चलबिचल होत आहे. अनेकांनी शिंदे गटात जाण्याची मानसिक तयारी केली असली तरी प्रत्यक्ष पाऊल उचललेले नाही. त्यामुळे पुण्यातल्या मेळाव्यात सातारा, सांगली, कोल्हापूर व पुण्यासह सोलापूर जिल्ह्यातील उर्वरित पदाधिकारी व शिवसैनिकांना सामावून घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in