राज्यातील दंगलीची चौकशी निवृत्त न्यायमूर्तीमार्फत व्हावी

भाजपाच्या कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाया थांबवाव्यात.
जगदीश मुळीक
जगदीश मुळीकसरकारनामा

पुणे : त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.

जगदीश मुळीक
नरेंद्र पाटील म्हणतात; ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी

मागील आठवड्यात त्रिपुरामध्ये जाळपोळ झाली असा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून नांदेड, मालेगाव, अमरावती येथे हिंसक घटना घडल्या.या घटनांना प्रतिकार करण्यासाठी बाहेर पडलेल्या सामान्य नागरिकांवर हल्ले झाले. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज शहर भाजपाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहराध्यक्ष मुळीक यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुळीक बोलत होते.

जगदीश मुळीक
बाळासाहेब ठाकरेंमुळेच 'मी नथुराम गोडसे बोलतोय' सादर करू शकलो

मुळीक म्हणाले, ‘‘ दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक करावी, दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी, स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई मागे घ्यावी, भाजपाच्या कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाया थांबवाव्यात, त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत आमच्या मागण्या आहेत.’’

Edited By : Umesh Ghongdade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com