सोशल मिडियावरील ते रिक्षाचालक मुख्यमंत्री ठाण्याचे नाही, तर पिंपरीचे

CM Eknath Shinde|Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकारणात येण्यापूर्वी ठाण्यात रिक्षाचालक होते.
Baba Kamble, PCMC Latest News
Baba Kamble, PCMC Latest NewsSarkarnama

पिंपरी : रिक्षाचालक म्हणून आपल्या करिअरची सुरवात करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दुसरीकडे सोशल मिडियात (Social Media) आज रिक्षाचालक मुख्यमंत्री म्हणून शिंदेच्या नावाचा मजकूर आणि त्यांच्या चेहऱ्याशी साम्य असलेला २५ वर्षापूर्वीचा जुना फोटो रिक्षासह झळकला. त्याची जोरदार चर्चा झाली. पण, ठाण्यातील एमएच-०३ ऐवजी पिंपरीतील एमएच-१४ असा त्या रिक्षाचा नंबर असल्याने संशय बळावला. म्हणून अधिक चौकशी केली असता हा फोटो २५ वर्षापूर्वीचेच रिक्षाचालक व सध्याचे मुख्यमंत्री ठाण्याचे शिंदे यांचा नाही, तर महाराष्ट्र रिक्षा पंचायत या रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष पिंपरी-चिंचवडच्या बाबा कांबळे (Baba Kamble) यांचा असल्याचे आढळले. (Baba Kamble, PCMC Latest News)

Baba Kamble, PCMC Latest News
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रथमच आले महाराष्ट्र सदनात!

दरम्यान, या फोटोवर कमेंटचा पाऊस पडला. हा फोटो कांबळेचा आहे, हे माहिती असणाऱ्या पिंपरी-चिंचवड, पुण्यातील रिक्षाचालकांनी आता आमचा बाबा (कांबळे) हा आमदार व किमान नगरसेवक, तरी होणार अशा प्रतिक्रिया दिल्या. तर, हा फोटो शिंदेचा आहे, हे समजलेल्यांनी रिक्षाचालकच मुख्यमंत्री झाले आहेत, यात काही शंका नाही अशा पोस्ट टाकल्या.

यावर सोशल मिडियावर मुख्यमंत्री झाल्याचा आनंद झाला का अशी विचारणा 'सरकारनामा'ने केली असता त्यावर कांबळे मनमोकळेपणे हसले. या पोष्टनंतर असंख्य फोन आल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या व शिंदेंच्या जुन्या फोटोत साम्य असल्याने नेटकऱ्यांचा गैरसमज झाला असावा, असा उलग़डा त्यांनी केला. एका बातमीसाठी मराठी दैनिकाला माझ्या कार्यालयातून हा फोटो देण्यात आला होता. नंतर तो सोशल मिडियात कसा गेला व फिरला हे, मात्र कळले नाही. पण रिक्षाचालकांत त्याची मोठी चर्चा झाली, असे कष्टकरी पंचायतीचेही अध्यक्ष असलेल्या कांबळे यांनी सांगितले.

Baba Kamble, PCMC Latest News
त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे मला सातत्याने फोन करायचे...बारणेंनी केलं गुपित उघड...

शिंदे हे राजकारणात येण्यापूर्वी ठाण्यात रिक्षाचालक होते. म्हणून एक रिक्षाचालक आज मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाला असल्याचे सांगणारी रिक्षासह तिच्या चालकाचा (शिंदेचा) फोटो असलेली ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली. नेहमीप्रमाणे व्हाटसअप विद्यापीठात त्याची खात्री न करता भरभरून कमेंट आल्या. मुंबई, ठाण्यातील ग्रुपवरही ती गेली. फेसबुकवरही पसरली. मात्र, त्यात रिक्षाचा नंबर एमएच-१४ असल्याने शंका आली. त्यामुळे फोटोशी साध्यर्म्य असलेल्या कांबळेंशी संपर्क साधला असता त्यांनी हा फोट आपला 1997 चा असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com