पाण्याच्या टाकीच्या निकालाने राष्ट्रवादीला चपराक, तर भाजपचे पितळ उघडे

पालकमंत्री अजित पवार यांनी स्थगिती दिल्याचा आरोप करीत भाजपचे नगरसेवक राजेंद्र लांडगे न्यायालयात गेले होते.
NCP - BJP
NCP - BJP Sarkarnama

पिंपरी : भोसरीतील पन्नास हजाराहून अधिक कुटुंबांसाठी उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीचा वाद भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वादामुळे थेट न्यायालयात गेल्याने मुलभूत गरजेचे हे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते. ते आभियांत्रिकदृष्ट्या योग्य अशा जागेवर तातडीने सुरु करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) पिंपरी-चिंचवड पालिकेला (PCMC) नुकताच दिल्याने आता हे काम मार्गी लागणार आहे. दरम्यान, या निर्णयावरूनही पुन्हा भाजप, राष्ट्रवादीत (NCP) श्रेयाची लढाई सोमवारी (ता.९ मे) सुरु झाल्याचे पहावयास मिळाले. या आदेशाने पाण्याच्या टाकीच्या राजकारणात राष्ट्रवादीला चपराक बसल्याचा दावा भाजपने केला. तर यामुळे भाजपचे पितळ उघडे पडल्याचे राष्ट्रवादीतून सांगण्यात आले. (Pimpri-Chinchwad Letest News)

NCP - BJP
गृहमंत्री वळसे पाटील आणि उदयनराजेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

भोसरीतील इंद्रायणीनगर, धावडेवस्ती, भगतवस्ती आणि गुळवेवस्ती भागातील रहिवाशांसाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक एकमधील प्लॉट क्रमांक चारवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने हे टाकी उभारण्याचे काम सुरु केले होते. मात्र, त्यासाठी तेथील दत्तमंदिर पाडण्यात येणार असल्याने त्याला स्थानिक रहिवाशांनी आक्षेप घेतला होता. तसेच ही टाकी शेजारच्या प्लॉट क्र. तीनवर उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार या कामाला उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्थगिती दिल्याचा आरोप करीत भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या वरील निर्णयामुळे त्याच्या दोन वर्षाच्या लढ्याला यश आल्याचा दावा भाजपने आज केला. तर, राजेंद्र लांडगे म्हणाले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि संजय उदावंत यांनी अजित पवार यांची दिशाभूल केली. त्यामुळे पाण्याच्या टाकीला खोडा बसला. या आडमुठेपणामुळे टाकीचे काम दोन वर्षे रखडले होते.

न्यायालयाच्या आदेशाने भाजपचे पितळ उघडे

भाजपने पालिकेतील सत्तेच्या जोरावर दत्त मंदिराच्या जागेवर पाण्याची टाकी उभारण्याचा चालविलेला प्रयत्न न्यायालयीन निर्णयामुळे उघडा पडला, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत यांनी दिली. ते म्हणाले, भाजपाच्या काही नगरसेवकांनी केवळ श्रेय लाटण्यासाठी प्राधिकरणाच्या सेक्टर क्रमांक १ मध्ये पाण्याची टाकी बांधण्याचा निर्णय घेतला होता. तेथे दत्त मंदिर असल्याने स्थानिक रहिवाशांचा त्याला विरोध होता. तसेच या ठिकाणी पाण्याची टाकी उभारणे हे तांत्रिकदृष्ट्याही चुकीचे होते. तरीही प्रशासनावर राजकीय दबाव टाकून हे काम सुरु ठेवल्याने त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे रहिवाशांचा विजय झाला असून भाजपला चपराक बसली. त्यामुळे आता नागरिकांच्या सोयीच्या आणि तांत्रिक दोष टाळून योग्य ठिकाणी ही टाकी बांधली जाईल, दत्त मंदिर पाडून तेथे हा जलकुंभ उभारण्याचा डाव नागरिकांच्या एकजुटीने उजनीत बुडवण्यात आला आहे.

NCP - BJP
शरद पवार करणार शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी, ईद सोहळ्यालाही राहणार उपस्थित

दरम्यान, जलकुंभ कुठे म्हणजे कुठल्या ठिकाणी वा जागेवर उभारायचा हे सांगणे न्यायालयाचे काम नाही. तो पालिकेने सोईच्या ठिकाणी आभियांत्रिकी बाजू विचारात घेऊन म्हणजे तांत्रिक बाबींचा विचार करून बांधावा, असे मत ही याचिका निकालात काढताना मुख्य न्यायमुर्ती दिपंकर दत्ता आणि न्या.व्ही.जी.बिश्ट यांनी निकालपत्रात नोंदवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in