HSC Result : प्रतिक्षा संपली! उद्या बारावीचा निकाल लागणार

HSC Result|Maharashtra Board| निकाल पाहण्यासाठी http://mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
HSC Result : प्रतिक्षा संपली! उद्या बारावीचा निकाल लागणार
HSC Result

HSC Result Latest news upadate

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board) दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच देशातील इतर राज्यांतील दहावी, बारावीचे निकाल मात्र जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या (८ जून) दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,१७,१८८ मुलं असून मुलींची संख्या ६,६८,००३ एवढी आहे.

- या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल

http://mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

https://mahresults.org.in

https://lokmat.news18.com

https://indiatoday.in/education-today/results

https://mh12.abpmajha.com

https://tv9marathi.com/board-result-resgistration-for-result-marksheet-12th

HSC Result
भाजपचे बुथ संमेलन रद्द : कारण देवेंद्र फडणवीस...

- गुणपडताळणी करायची असेल तर...

ऑनलाईन निकालानंतर बारावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी ( श्रेणी विषयांव्यतिरिक्त ) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने अधिकृत संकेतस्थळावरुन ( http://verification.mh-hsc.ac.in ) स्वत : किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी-शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहे . गुणपडताळणीसाठी आणि छायाप्रतीसाठी शुक्रवार (१०जून) ते बुधवार (२९ जून) पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड य़ुपीआय आणि नेट बॅंकिंग द्वारे भरता येईल .

- पुनर्मूल्यांकन करण्यासाठी

ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. त्यादिवसापासून कार्यालयीन कामकाजातील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी नियोजित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा .

- पुनर्परिक्षार्थींनी काय करायचे

जुलै - ऑगस्ट २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार ( १० जून) पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने र्ज भरुन घेण्यात येतील. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येईल. बारावीच्याविद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्य महाविद्यालयामार्फत शुक्रवार (१७ जून) रोजी दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in