कोरोनावाढीचा वेग दिवसाला दुप्पट होतोय...विविध शहरांत चिंतेची स्थिती

जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा सर्व आस्थापनांमध्ये कोविड लशीच्या दोन मात्रा न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही.
Corona

Corona

Sarkarnama

पुणे : राज्यात विविध शहरात कोरोना (Corona) रूग्णांचा आकडा आज अचानक वाढला आहे.तब्बल १८ हजार ४६६ जणांना आज दिवसभरात लागण झाली आहे. या आकड्यांनी राज्याची चिंता वाढवली असून उद्या मुंबईत (Mumbai) होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होऊन नव्या निर्बंधांबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

<div class="paragraphs"><p>Corona</p></div>
पुण्यात रूग्णवाढीचा दर तीन दिवसाला दुप्पट : एका दिवसात अकराशे पॉझिटिव्ह

दरम्यान, जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा सर्व आस्थापनांमध्ये कोविड लशीच्या दोन मात्रा न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात दिले आहेत.पवार म्हणाले, ‘‘ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोविड संसर्गाची स्थिती बिकट होत आहे. १०५ देश, भारतातील २३ राज्ये आणि राज्यातील ११ शहरात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात एकाच दिवसाचा पॉझिटीव्हीटी दर १८ टक्के आला आहे. या पार्श्वभूमीवर ३० जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीचे वर्ग बंद राहतील, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहील. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याने नववी आणि दहावीचे वर्ग सुरू ठेवावेत.’’

<div class="paragraphs"><p>Corona</p></div>
ओमिक्राॅनचा धसका पुण्यात : आठवीपर्यंतच्या शाळा तातडीने बंद, मास्क नसेल तर मोठा दंड

दोन लसमात्रा नाही तर प्रवेश नाही

नव्या प्रकारच्या कोविड विषाणूचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वाढविणे नितांत गरजेचे आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात आले आहे. तरीदेखील बऱ्याच नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली नसल्याने जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खाजगी अशा सर्वच आस्थापनांमध्ये ‘दोन लसमात्रा नाही तर प्रवेश नाही’ या नियमाचे बंधन घालण्यात यावे. उपहारगृहे, मॉल्स, दुकाने, सिनेमागृहे, नाट्यगृहे तसेच इतर आस्थापना चालकांनी लशीच्या दोन मात्रेशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये, असे आवाहन पवार यांनी केले.

मुखपट्टी नसेल दर दंड निश्चित

कोविडपासून बचावासाठी मुखपट्टीचा (मास्क) उपयोग आवश्यक आहे. त्यामुळे मुखपट्टी न वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड करण्यात यावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात यावा आणि या निर्देशाचे कठोरतेने पालन करावे, असे पालकमंत्री पवार यांनी सांगितले. कोविड नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी ‘थ्री प्लाय’ किंवा ‘एन-९५’ प्रकारच्या मुखपट्टीचा वापर करावा, अन्य प्रकारची मुखपट्टी (मास्क) सुरक्षित नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असल्याने त्याचा उपयोग टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘ओमायक्रॉनच्या उपचार पद्धतीबाबत लवकरच निर्णय : राजेश टोपे’

ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यास बाधित व्यक्तीचा विलगीकरण कालावधी आणि उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. संसर्ग वाढल्यास लागणारे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याविषयीदेखील केंद्र सरकारशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. कोविडचा संसर्ग वाढल्यास उपचारासाठी आवश्यक औषधांची उपलब्धता तातडीने करून देण्यात येईल. पात्र नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा त्वरीत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

विविध शहरातील आजच्या कोरोना रूग्णांची आकडेवारी

पुणे : ११०४

नवी मुंबईत - 1072

पनवेल - 521

पनवेल ग्रामीण - 68

खालापूर - 17

अलिबाग - 2८

पेण - 23

रोहा -17

माणगाव - 10

कर्जत - 8

महाड - ५

उरण - २

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in