Pune Police| पोलिसांच्या नियंत्रणाअभावी लांबली पुण्यातली मिरवणूक

Pune Ganesh Visarjan 2022| शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून शहरातील गणेण विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली
Pune Police| पोलिसांच्या नियंत्रणाअभावी लांबली पुण्यातली मिरवणूक

पुणे : पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक २४ तासांनंतरही रेंगाळल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा होऊ लागला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि मंडळामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.

आज सकाळी 9.45 वाजता अखिल मंडई मंडळ अलका चौकात पोहचले. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ सकाळी 10.15 वाजता अलका चौकात आले. तर दरवर्षी या मंडळांचे सकाळी सातच्या आत विसर्जन होते. पण एकूण परिस्थिती पाहता पोलिसांचे मिरवणूक मंडळावर नियंंत्रण नव्हते असेच लक्षात येत.

Pune Police| पोलिसांच्या नियंत्रणाअभावी लांबली पुण्यातली मिरवणूक
Eknath Shinde : भुमरेंचे शक्तीप्रदर्शन ; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी दुभाजक फोडले..

शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाच्या गणपती मंडळांच्या पुढे असलेल्या ढोल-ताशा पथकांमुळे या मंडळांनी प्रचंड प्रमाणात वेळखाऊपणा केला. त्यामुळे मानाच्या पाचवा केसरी वाड्यातील गणपतीचे विसर्जन शुक्रवारी रात्री 9.30 वाजता झाले. त्यानंतर शनिवारी सकाळी सात वाजले तरी प्रमुख मंडळे मुख्य विसर्जन मार्गावर पोहचली नव्हती. गणपतींच्या रथासमोर असलेली ढोल-ताशा पथके, डिजे इत्यांदीमुळे विसर्जन मिरवणुकांना उशीर होण्यास कारणीभूत ठरले.

याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना विचारले असता ते म्हणाले की, "पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ढोल ताशा पथकांमध्ये पडलेल्या अंतरामुळे विसर्जनासाठी वेळ लागत आहे. पोलीसाकडून सकाळपासून मंडळांना पुढे आणण्यात आले आहे, मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी पोलीस प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे," असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शनिवारी स्पष्ट केले.

"विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. त्यादृष्टीने संबंधित मंडळांसोबत झालेल्या बैठकमध्ये सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र ढोल ताशा पथकांमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर पडल्याने मिरवणुकांना विलंब झाला. पण आज सकाळपासूनच आम्ही अधिकाधिक मंडळे पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत." असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com