पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

आतापर्यंत सर्वाधिक 25 उमेदवारी अर्ज 11 उमेदवारांनी दाखल केले आहे.
PDCC Bank Election
PDCC Bank ElectionSarkarnama

पिंपरी : कोरोनामुळे (Covid-19) वर्षभर लांबलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची (PDCC) म्हणजे `पीडीसीसी`ची पंचवार्षिक निवडणूक नवीन वर्षात 2 जानेवारीला होऊ घातली आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.1 डिसेंबर) आतापर्यंत सर्वाधिक 25 उमेदवारी अर्ज 11 उमेदवारांनी दाखल केले. आतापर्यंत 29 उमेदवारी अर्ज आले आहेत. त्यात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे,(Dattatray Bharane) आमदार (खेड) दिलीप मोहिते-पाटील,(Dilip Mohite) आमदार संजय जगताप (पुरंदर) (Sanjay Jagtap) आणि विद्यमान अध्यक्ष रमेशअप्पा थोरात (Ramesh Thorat) यांचा समावेश आहे.

PDCC Bank Election
राष्ट्रवादीकडून बँकेवर बिनविरोध अन् आता पाटलांना साथ दिल्यानं भरणेंची प्रतिष्ठा पणाला

बुधवारी सर्वाधिक सहा उमेदवारी अर्ज संजय काळे यांनी (अ वर्ग जुन्नर तालुका) दाखल केले. त्यांनी पहिल्या दिवशीही एक अर्ज दाखल केला आहे. म्हणजे त्यांच्या अर्जांची संख्या आता सात झाली आहे. त्यांच्याजोडीने पहिल्या दिवशी मोहिते, जगताप तसेच, थोरात यांनी 'अ' वर्ग म्हणजे विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले आहेत. काळे यांच्या खालोखाल 'अ' वर्गातूनच मावळ तालुक्यातून ज्ञानोबा ऊर्फ माऊली दाभाडे यांनी आज (ता.1 डिसेंबर) चार उमेदवारी अर्ज दाखल केले. ते दारुंब्रे (ता.मावळ) येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. रेवणनाथ दारवटकर (अ वर्ग,वेल्हा) यांनी दोन, भरणे यांनी 'क' वर्गातून तीन, तर दत्तात्रेय येळे यांनी 'ड' वर्गामधून तीन उमेदवारी अर्ज आज दाखल केले. अंकुशराव काकडे (पुणे) यांनी 'ड' मधून, राजेंद्र कांचन (उरुळीकांचन) यांनी 'क', तर निवृत्ती गवारी यांनी 'अ' तून (शिरूर) आज उमेदवारी दाखल केली.

PDCC Bank Election
पवारांच्या भेटीनंतर ममतांची काँग्रेस वगळून आघाडी अन् वेणूगोपाल म्हणाले, शक्यच नाही!

महिला प्रतिनिधी म्हणून स्नेहलता कांचन (उरुळीकांचन), अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून तुळशीराम भोईर (जुन्नर), तर दत्तात्रेय येळे (जुन्नर) यांनी विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

पीडीसीसीच्या २१ संचालकांच्या जागांकरिता दोन जानेवारीला मतदान, तर 4 तारखेला निकाल आहे. 21 पैकी सर्वाधिक 13 जागा 'अ' वर्ग मतदारसंघा आहेत. एकेक जागा ब (पणन,प्रक्रिया), क (पतसंस्था,नागरी बॅंका), ड (उर्वरित), एससीएसटी, एनटी, ओबीसी आणि महिला अशी आहे, असे निवडणूक अधिकारी मिलिंद सोबळे यांनी आज सरकारनामाला सांगितले. 29 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. त्याची मुदत 6 डिसेंबरपर्यंत आहे. दुसऱ्या दिवशी (ता.7 डिसेंबर) उमेदवारी अर्जांची छाननी होऊन दोन जानेवारीला मतदान होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com