भाजपचे 25-30 नगरसेवक फोडण्यासाठी राष्ट्रवादीचा ठरलाय हा प्लॅन

नगरसेविका चंदा लोखंडे या सुद्धा राष्ट्रवादीत (NCP) येण्याची शक्यता शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) त्यांनी वर्तवली आहे.
Ajit Gavhane & NCP Leaders
Ajit Gavhane & NCP LeadersSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सत्ताधारी भाजपचे २५-३० नगरसेवक संपर्कात असून त्यांचा टप्याटप्याने पक्षात प्रवेश होईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी गुरुवारी (ता.२४ फेब्रुवारी) सांगितले. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर (Shivsena) युतीचे संकेत त्यांनी यावेळी दिले. मात्र, तो निर्णय अजित पवार (Ajit Pawar) हे घेतील, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी ही युती झाली, तर त्याचे नियोजन सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Ajit Gavhane & NCP Leaders
आमदार महेश लांडगेंची मलिकांवर टीका करतांना जीभ घसरली; केले वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, आजच नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेले भाजपचे तुषार कामठे हे राष्ट्रवादीत प्रवेश होईल, असे गव्हाणे यांनी सांगितले. कामठेंअगोदर राजीनामा दिलेल्या भाजपच्या नगरसेविका चंदा लोखंडे या सुद्धा पक्षात येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. अॅक्टिव्ह पदाधिकाऱ्यांना कायम ठेवताना इनअॅक्टिव्ह असणाऱ्यांना नवीन शहर कार्यकारिणी करताना डच्चू दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची परिवार संवाद यात्रा पाचव्या टप्यात पश्चिम महाराष्ट्रात येत आहे. शनिवारी (ता.२६ फेब्रुवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये ती येणार आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकारपरिषदेत गव्हाणे बोलत होते.

Ajit Gavhane & NCP Leaders
Supriya Sule यांना CM करण्याच्या हालचाली, या चंद्रकांतदादांच्या दाव्यावर त्या म्हणाल्या...

शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, मुख्य शहर प्रवक्ते योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी सरचिटणीस तथा माजी मुख्य प्रवक्ते फजल शेख यावेळी उपस्थित होते. जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर हे या परिवार यात्रेत शहरातील मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत. नंतर ते कार्यकारिणीची बैठक घेऊन वन टू वन चर्चाही करणार आहेत. पक्ष संघटना बळकट करून त्यातून निवडणूक तयारी केली जाणार असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. अजित पवारही यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. पाटील व चाकणकर हे सायंकाळी मावळातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी या यात्रेत संवाद साधणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com