राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या ‘त्या’ खासदाराला पक्ष समज देणार

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दौऱ्याबाबत त्यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याचा भाजपाशी काहीही संबंध नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
Chandrakant Patil, Raj Thackeray
Chandrakant Patil, Raj Thackeraysarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उत्तरप्रदेश दौऱ्याला विरोध करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे खासदार ब्रिजभूषणसिंह यांचे ते मत वैयक्तिक आहे. ती पक्षाची भूमिका नाही. तरीही पक्ष त्यांना समज देईल, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज सांगितले.

Chandrakant Patil, Raj Thackeray
राज ठाकरेंना धमकावणाऱ्या खासदाराला थेट योगी आदित्यनाथांचा फोन...

खासदार ब्रिभूषणसिंह हे उत्तरप्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत त्यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याचा भाजपाशी काहीही संबंध नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा, किरीट सोमय्या, मोहीत कंबोज यांना विविध प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. मात्र, भारतीय जनता पार्टी या सर्वांच्या मागे खंबीरपणे उभी असून आम्ही या सरकारला पुरून उरू, असे पाटील यांनी सांगितले.

Chandrakant Patil, Raj Thackeray
भाजपच्या एका नेत्यासाठी तीन राज्यांचे पोलीस आमनेसामने; तब्बल सात तास 'भागमभाग'

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारले असता, पाटील म्हणाले, ‘‘ राज्य सरकारने निवडणुकांचे पुरते खोबरे केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेची निवडणूक झालेली नाही. न्यायालयाच्या निकालामुळे सरकारला आता निवडणूक लांबणीवर टाकता येणार नाहीत.निवडणुका नेमक्या कधी होतील हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.’’

राज्यातील सरकार ओबीसी समाजाला ‘लॉलीपॉप’ दाखवत आहे. ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाची फसवणूक करण्याचे काम या सरकारने केले आहे. मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाचे आरक्षण केवळ या सरकारमुळे गेले आहे. न्यायालयात बाजू मांडण्यासाठी पुरेशी तयारी न केल्याने आरक्षण गेले असून राज्य सरकार यास पूर्णपणे जबाबदार असल्याची टीका पाटील यांनी केली.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com