बारणे ज्या पक्षात जातात तो पक्ष संपतो, आता शिंदे गटही संपवून टाकतील

MP Shrirang Barne|Shivsena : खासदार बारणे हे शिवसेनेला लागलेले ग्रहण होते, अशी टीका शिवसैनिकांनी केली आहे.
Pimpri Chinchwad Shivsena Latest News
Pimpri Chinchwad Shivsena Latest News Sarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) प्रतिनिधीत्व करणारे शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) व माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे दोघेही पक्षाचे बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेले आहेत. त्याचा निषेध म्हणून पिंपरी-चिंचवड शिवसेनेने आज (21 जुलै) या दोघांविरुद्ध आंदोलन केले. त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यासाठी त्यांनी आणलेली तिरडी पोलिसांनी जप्त केल्याने तो फसला. दरम्यान, शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने ते फक्त शिवसैनिक म्हणजे कार्यकर्त्यांचेच ठरले. (Pimpri Chinchwad Shivsena Latest News)

Pimpri Chinchwad Shivsena Latest News
सत्तांतरानंतर भाजपचं पहिलं सेलिब्रेशन पनवेलमध्ये...

खासदार बारणे ही शहराला लागलेली पणवती होती. त्यामुळे ते गेले हे बरे झाले, अशी जहरी टीका पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी यावेळी केली. बारणे जरी शहरात होते, तरी त्यांचा शिवसेनेला काही फायदा नव्हता. उलट ज्या पक्षात ते जातात तो पक्ष संपतो. ते काँग्रेसमध्ये होते, तेव्हा शहर काँग्रेस संपली. ते शिवसेनेत आले आणि पक्षाचे नगरसेवक कमी झाले. ते शहराला लागलेली पणवती होती. ते गेले हे बरे झाले. आता शिंदे गटात गेले आहेत. ते पुढे हा गटही संपवून टाकतील. कारण ते म्हणजे शिवसेनेला लागलेले ग्रहण होते, अशी कडवट टीका अॅड. भोसलेंनी केली. बारणेंनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवण्याचे आव्हान देखील त्यांनी दिले. कारण पुढील काळात त्यांची लायकी आणि औकात त्यांना कळणार आहे, असे ते म्हणाले.

Pimpri Chinchwad Shivsena Latest News
..म्हणून त्यांच्या पोटात दुखतयं; आदित्य ठाकरेंनी केली बंडखोरांची पोलखोल

आगामी पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीवर या गद्दारीचा काहीही विपरित परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला. भोंगा, हनुमानचालीसा आदीव्दारे दंगली घडवीत महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न फसल्याने या गद्दारांना हाताशी धरून अखेर भाजपने कुटील डाव खेळला, असे ते म्हणाले.

शहर उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, प्रसिद्धीप्रमुख भाविक देशमुख, अल्पसंख्यांक प्रमुख हाजी दस्तगीर मणियार, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, विधानसभा संघटिका अनिता तूतारे, माजी विधानसभा संघटिका मंगला घुले, शहर संघटक रोमी संधू तसेच संतोष सौंदणकर आदींनी या आंदोलनात भाग घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in