पुणे जिल्ह्यात रूग्णसंख्या चार दिवसात आठ हजाराने कमी

पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ओहोटी सुरु झाल्याचे चित्र मागील चार दिवसांतील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येवरून स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्ह्यात रूग्णसंख्या चार दिवसात आठ हजाराने कमी
corona puneSarkarnama

पुणे : पुणे जिल्ह्यात (Pune District) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ओहोटी सुरु झाल्याचे चित्र मागील चार दिवसांतील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ८ हजार १३ ने कमी झाली आहे. शिवाय दिवसातील नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रूग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या कोरोना आकडेवारीच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

corona pune
मंत्री महोदय आदित्य ठाकरे, आपले नाशिकमध्ये स्वागत!

गुरूवारी दिवसभरात जिल्ह्यात ८ हजार ९४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून १४ हजार ४०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.याशिवाय दिवसभरात जिल्ह्यातील ११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील पाच, पिंपरी-चिंचवडमधील तीन, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ आणि नगरपालिका हद्दीतील २ कोरोना मृत्यू आहे. दिवसभरात कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही.

corona pune
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक चार हजार १३६ नवे रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दोन हजार ३८६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात एक हजार २०६, नगरपालिका हद्दीत २७६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ९० नवे रुग्ण सापडले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये शहरातील सर्वाधिक सात हजार ४१० जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील चार हजार ९२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन हजार १०३, नगरपालिका हद्दीतील ७०३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

चार दिवसांतील जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या

२४ जानेवारी ---- ९३ हजार ६४२

२५ जानेवारी ----- ९२ हजार ९७३

२६ जानेवारी ------ ९१ हजार ९५३

२७ जानेवारी ------ ८५ हजार ६२९

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in