चिंचवडचा पुढील आमदार महाविकास आघाडीचा असेल...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादी लागली निवडणूक तयारीला
चिंचवडचा पुढील आमदार महाविकास आघाडीचा असेल...
Ajit Pawar& Pimpr NCP LeadersSarkarnama

पिंपरी : येत्या दोन आठवड्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक (Local Body Election) जाहीर करण्याचा आदेश काल (ता.४ मे) सर्वोच्च न्यायालयाने देताच राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पुन्हा निवडणूक तयारीला लागली आहे. त्यातही पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) पुन्हा सत्ता आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) मिशनला गती देण्यासाठी पक्षबांधणी जोरात सुरु केली असून या आठवड्यात शहर कार्यकारिणी जाहीर करणार आहेत.

Ajit Pawar& Pimpr NCP Leaders
शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी

दरम्यान, आगामी महापालिका निवडणूक तयारीचा भाग म्हणून पिंपरी-चिंचवडसाठी नवीन शहराध्यक्ष, महिलाध्यक्ष, युवक अध्यक्ष आणि तीन कार्याध्यक्ष राष्ट्रवादीने दिल्यानंतर आता शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघालाही काल (ता.४ मे) पक्षाने अध्यक्ष दिले. पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी अनुक्रमे शाम लांडे, पंकज भालेकर आणि विनोद नढे यांची नियुक्ती करण्यात आली. काल अजित पवार यांनी मुंबईत या नेमणुकीचे पत्र या तिघांना दिले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे उपस्थित होते.

तिघेही नवनियुक्त तरुण पदाधिकारी हे माजी नगरसेवक आहेत. गत पालिका सभागृहात ते होते. तिघांनीही पु्न्हा पालिकेत पक्षाची सत्ता आणणार असल्याची प्रतिक्रिया या नियुक्तीनंतर 'सरकारनामा'ला दिली. पिंपरीत सध्या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आहेत. तर भोसरी आणि चिंचवडमध्ये भाजपचे महेश लांडगे व लक्ष्मण जगताप आहेत. २०२४ ला तेथेही पक्षाचा आमदार होईल, यादृष्टीने प्रयत्न करू, असे भालेकर व लांडे यांनी सांगितले.

Ajit Pawar& Pimpr NCP Leaders
एसटीचे वातावरण खराब करणाऱ्यांना सोडणार नाही; अनिल परबांचा इशारा

दरम्यान, काल गव्हाणे यांनी अजित पवारांना नवीन शहर कार्यकारिणीची यादी दिली. तिला मंजूरी मिळाल्यानंतर ती या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणार असल्याची प्रतिक्रिया नढे यांनी दिली. चिंचवडचा पुढील आमदार हा महाविकास आघाडीचा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालिकेत पुन्हा पक्षाची सत्ता शंभर टक्के आणणार असल्याचे लांडे यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात एवढा भ्रष्टाचार भाजपने केला आहे की जनताच त्यांना आता घरी बसवणार आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या कार्यकाळात कामेच झाली नाहीत. साधा पाण्याचाही प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. उलट तो जटिल करून ठेवला. आमच्या काळातील दररोजचा पाणीपुरवठा त्यांनी दिवसाआड केला, असा हल्लाबोल त्यांनी केला.

पक्षाने दिलेली जबाबदारी निश्चीतपणे पार पाडू, त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू, असे सांगत भोसरीतून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणणार असल्याचे भालेकर यांनी सांगितले. पालिकेत पुन्हा पक्षाची सत्ता, तर आणणारच आहे, शिवाय भोसरीचा पुढील आमदारही पक्षाचा करणार असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.