
पुणे : राज्यसभेची निवडणूक ही चमत्काराची निवडणूक नव्हती तर नियोजनपूर्वक केलेल्या कामाचे यश होते. राज्यसभेवरील या विजयाची पुनरावृत्ती विधानपरिषदेच्या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही. मतदारांशी गद्दारी करून सत्तेत आलेल्या या राज्य सरकारला ‘जैसा कर्म करेगा वैसा फल देगा आमदार’ या पद्धतीनेच उत्तर मिळेल, असा विश्वास माजी मंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केला.
मुनगंटीवार म्हणाले, ‘ राज्यातील मतदारांशी गद्दारी करून २४ ऑक्टोबर २०१९ ला राज्यात सरकार सत्तेवर आलं. या सरकारला विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आमदार धडा शिकवणार आहेत. राज्यातल्या लोकांची असलेली नाराजी या निमित्ताने या मतदानातून पुढे येणार आहे, असे मुनगंटवीवार यांनी सांगितले. राज्यसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे. गुप्त मतदान पद्धतीने होणाऱ्या विधानसभेच्या सहा जागांसाठी भारतीय जनता पक्षासह महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ आहे. प्रत्येकजण दुसऱ्या पक्षाची मते फउटणार असल्याचे सांगत आहे.
ही निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने अत्यंत काटेकोर नियोजनपूर्वक रचना केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. कोटेकोर नियोजनाची अंमलबजावणी त्याच पद्धतीने अगदी काटेकोरपणे केली जाईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
पहिल्या फेरीतच सर्व पाचही आमदार निवडून येतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या गोटातून व्यक्त करण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत महाविकास आघाडीत विशेषतः शिवसेनेची मते फुटू नयेत यासाठी शिवसेनेने विशेष दखल घेतली आहे. यासाठी मुख्यमंत्री व शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना आवाहन केले आहे. आपला एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या मतदानात कुणाची मते खरच किती फुटतात आणि कोणाचा विजय होतो हे स्पष्ट होणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.