काय सांगता! स्मार्ट व्हिलेजचा कारभार पती-पत्नीच्या हातात,पत्नी सरपंच अन् पतीची उपसरपंचपदी निवड...

pune : गावच्या ग्रामपंचायत इतिहासातील पहिलीच घटना
Grampanchat Election Latest News
Grampanchat Election Latest NewsSarkarnama

आंबेठाण : मॉडेल आणि स्मार्ट व्हिलेज म्हणून राज्यात नामांकन मिळविलेल्या आंबेठाण (ता.खेड ) ग्रामपंचायतीचा कारभार आता पती-पत्नीच्या अधिकाराखाली चालणार आहे. येथील सरपंच संघमित्रा नाईकनवरे यांची यापूर्वी लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाली होती तर आता त्यांचे पती दत्तात्रेय नाईकनवरे यांची आज (ता.१२ ऑक्टोबर) उपसरपंच म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता पती-पत्नी गावचा कारभार पाहणार असल्याची ही गावच्या ग्रामपंचायत इतिहासातील पहिलीच घटना असून जिल्ह्यातील देखील बहुधा पहिलीच ग्रामपंचायत असेल. (Grampanchat Election Latest News)

Grampanchat Election Latest News
संजय राऊत भेटल्यावर फक्त तीनच प्रश्न विचारतात...

आंबेठाण ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच तुळसाबाई अर्जुन घाटे यांनी राजीनामा दिल्याने या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. येथील ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी दत्तात्रय पांडुरंग नाईकनवरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संघमित्रा नाईकनवरे या होत्या तर ग्रामविकास अधिकारी रविंद्र उगले यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेनेचे तालुका संघटक आणि माजी सरपंच सुभाष मांडेकर, माजी सरपंच गणेश मांडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष शरद मांडेकर, सोसायटी संचालक बबन घाटे, भानुदास दवणे, दत्तात्रय चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

Grampanchat Election Latest News
Sanjay Raut : आई..मी लवकरच परत येईन...संजय राऊत यांचं आईला भावनिक पत्र...

याप्रसंगी सभागृहात लोकनियुक्त सरपंच संघमित्रा नाईकनवरे, मावळत्या उपसरपंच तुळसाबाई घाटे, माजी सरपंच आणि सदस्य दत्तात्रय मांडेकर, शांताराम चव्हाण, अमोल दवणे, लक्ष्मण भालेराव, रुपाली गोणते, अहिल्याबाई पडवळ, रुपाली मांडेकर, आरती आरडे, ज्योती मांडेकर या ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी म्हाळुंगे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. निवडीनंतर कार्यकर्त्यानी ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com