Baramati NCP Politics : बारामतीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांचं ठरलं; अजितदादांच्या बैठकीला उपस्थित राहणार...

Maharashtra Politics : बारामतीतील अनेक कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवून आम्ही दादांबरोबर राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी जाहीर केलेले आहे...
Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad PawarSarkarnama

Baramati : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चांगल्याच अडचणीत सापडले आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीत अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार असे दोन वेगवेगळे गट निर्माण झाले आहेत. अजित पवार यांचे किती समर्थक आमदार आहेत याबाबतचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही.

दोन्ही गटाच्या प्रमुखांकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच दोन्ही गटाकडून आमदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. याचदरम्यान आता बारामतीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या बैठकीला जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर येत आहे.

शरद पवार(Sharad Pawar) यांनी बुधवारी (दि.५) वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक बोलावली आहे. तर अजित पवार यांनी वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीचे आमदार कोणत्या बैठकीला जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.पण याचवेळी बारामतीतील कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या गटाऐवजी अजित पवार यांच्या बैठकीला जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.

Ajit Pawar-Sharad Pawar
Amol Kolhe News: खासदार अमोल कोल्हेंचा राजीनामा खिशातच; पवारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

बारामती शहर व तालुक्यातील विविध सहकारी संस्थावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व असल्यानं मुंबईत बुधवारी (दि, ५) होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीऐवजी अजित पवार यांच्याच बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

याबाबत माहिती घेतल्यानंतर विविध सहकारी संस्था, संघटनांचे पदाधिकारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी(Ncp)ने आयोजित केलेल्या बैठकीला हजर राहणार आहेत. यात विद्यमान पदाधिका-यांसह अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते देखील त्यांच्या समर्थनार्थ मुंबईला या बैठकीला हजेरी लावणार आहेत.

Ajit Pawar-Sharad Pawar
Amol Mitkari News : राष्ट्रवादीच्या 'एन्ट्री'नं आधीच शिवसेनेत नाराजी, त्यात मिटकरींचा मोठा बाॅम्ब ; '' याचवर्षी अजितदादा मुख्यमंत्री...''

गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार(Ajit Pawar) यांच्याशी असलेला स्नेह तसेच विविध अडचणींच्या प्रसंगी त्यांनी केलेली मदत, त्यांचा कामाचा झपाटा व त्यांनी या परिसराचा केलेला सर्वांगिण विकास याचा विचार करुन अजित पवार यांच्यासोबत उघडपणे जाण्याचा निर्णय अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला आहे. या काळात अजित पवार यांना मानसिकदृष्टया साथ देण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे विचार करुनच आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

बारामतीतील अनेक कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवून आम्ही दादांबरोबर राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी जाहीर केलेले आहे. काल पण त्यांच्यासोबत होतो आजपण त्यांच्यासोबतच आहोत आणि उद्यापण त्यांच्यासोबतच राहू अशा आशयाचे स्टेटस अनेकांनी ठेवले आहे. दरम्यान, अनेकांनी आपल्यासोबत काही कार्यकर्त्यांना नेण्याचीही तयारी केलेली आहे. बारामतीचा आवाज बुधवारी(दि.५) मुंबईत घुमेल असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com