Maharashtra Kustigir Parishad | Sharad Pawar
Maharashtra Kustigir Parishad | Sharad PawarSarkarnama

Maharashtra Kustigir Parishad: कुस्तीगीर परिषद नेमकी कुणाची; आज ठरणार ? शरद पवार यांची उपस्थिती !

Pune Politics| अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाने 30 जून 2022 रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता.

Maharashtra Kustigir Parishad: पुण्यात आज (३ जून) महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे. या सभेला राज्यभरातील कुस्ती संघ आणि सहयोगी संघांशी संलग्न असलेल्या 45 संघांचे प्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहेत.त्यामुळे कुस्ती परिषदेचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (The Kustigir Parishad will be decided in the presence of Sharad Pawar)

-काय आहे प्रकरण?

अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाने 30 जून 2022 रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे (Maharashtra Kustigir Parishad) संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. शरद पवार (Sharad Pawar) हे या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. तर बाळासाहेब लांडगे हे सरचिटणीस पदी होते.

त्यानंतर आता नव्याने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर नव्याने अध्यक्षांची निवड करण्यात आली. भाजप (BJP) खासदार रामदास तडस यांची कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे.

Maharashtra Kustigir Parishad | Sharad Pawar
Eknath Khadse Meets Pankaja Munde : खडसेंच्या भेटीनंतर पंकजा काय निर्णय घेणार ; खडसे म्हणाले ; 'संघर्षयात्री..'

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन झालेल्या कार्यकारिणीचा कार्यकाळ 2023 पर्यंत होता. त्यामुळे अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघांच्या बरखास्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे (Balasaheb Landge) यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही लांडगे यांच्या बाजूने निकाल दिला.

बरखास्तीचा निर्णय अयोग्य ठरवत मुंबई उच्च न्यायालयाने जुनी कार्यकारीणी आपला कार्यकाळ संपेपर्यंत परिषदेच्या घटनेप्रमाणे कामकाज पाहिलं, असं स्पष्ट केलं.

-आजच्या बैठकीत काय होणार ?

न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांपासून शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत कोणतीही उघड भूमिका घेतली नव्हती. पण आता शरद पवार अलीकडे उघडपणे भूमिका घेताना दिसत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कुस्तीगीर परिषदेवर वर्चस्व असलेल्या बाळासाहेब लांडगे यांचा जो गट आहे, त्यांच्या बाजूने बोलताना दिसत आहेत.

Maharashtra Kustigir Parishad | Sharad Pawar
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर भाजप खासदार रामदार तडस बिनविरोध

आजच्या बैठकीत राज्यभरातील कुस्ती संघ आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या संघाचे ४५ प्रतिनीधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद नेमकी कोणाची हे दाखवण्याचा आज प्रयत्न असणार आहेत. भाजप आमदार रामदास तडस यांच्या नेतृत्त्वात जरी नवी कुस्तीगीर संघटना स्थापन झाली असली तरी राज्यभरातील कुस्ती संघ आमच्या बाजूने आहे. हे दाखवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com