Transgender : तृतीय पंथीयांच्या हक्कासाठी देशाच्या निवडणूक आयुक्तांचा पुढाकार!

Transgender : तृतीयपंथी व्यक्तींना स्वतःची ओळख सांगता येईल, असे कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसतात.
Rajiv kumar
Rajiv kumar Sarkarnama

पुणे : स्वतःची एक ओळख निर्माण करण्यापासून ते तृतीयपंथी समुदायाबद्दल समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक करण्यासाठी तुम्ही अविरत झटत आहात, काम करत आहात. तृतीयपंथी समुदायाबद्दल कायद्यातील बदल, आरक्षण आणि तुमच्या नोकरीसंबंधीचे विषय आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. मात्र सर्व तृतीयपंथीयांना निवडणूक ओळखपत्र मिळवून देणे ही आमचे कर्तव्य आहे. यासाठी सर्व प्रयत्न करणार, असा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी तृतीयपंथी समुदायाला दिला.

देशपातळीवर सुरू असलेल्या मतदान नोंदणी कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त राजीव कुमार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयुक्तांनी तृतीयपंथी आणि फिरस्ते नागरिकांच्या प्रतिनीधीशी संवाद साधला. मतदार यादीतील दुबार नावांची तपासणी करणे, नवीन नावांची नोंदणी करणे, असा या उपक्रमांचा उद्देश आहे.

Rajiv kumar
Devendra Fadanvis : संजय राऊतांनी मागणी केली तर भेट देणार ; कटुता एक पक्ष संपवू शकत नाही!

याच उपक्रमाचा भाग म्हणून, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मार्फत काम करणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो आणि बहु-माध्यम माहिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, निवडणूक आयोगाच्या माध्यम महासंचालक शेफाली शरण, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे, केंद्रीय संचार ब्यूरोचे अतिरिक्त महासंचालक रंजना देव शर्मा आणि पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख उपस्थित होते.

याच उपक्रमाचा भाग म्हणून, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मार्फत काम करणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो आणि बहु-माध्यम माहिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, निवडणूक आयोगाच्या माध्यम महासंचालक शेफाली शरण, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे, केंद्रीय संचार ब्यूरोचे अतिरिक्त महासंचालक रंजना देव शर्मा आणि पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख उपस्थित होते.

देशपांडेच्यां अध्यक्षतेखाली समिती :

तृतीयपंथी व्यक्तींना स्वतःची ओळख सांगता येईल, असे कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसतात. निवडणूक आयोगाने या मुद्याचा गांभिर्याने दखल घेतली. त्यामुळे आता तृतीयपंथांना ओळखपत्रे उपलब्ध होतील. यासंदर्भात निवडणूक आयोगाचे प्रमुख श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. जन्माचा दाखला, प्रतिज्ञापत्र, तसेच मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रे प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी, ही समिती काम करेल. संवेदनशील असलेल्या दुर्गम भागातील ७५ गट, बेघर, तसेच अन्य प्रकारच्या घटकांना देखील मतदान प्रक्रियेत समावेश करण्याचा प्रयत्न आहे, याकडे राजीवकुमार यांनी लक्ष वेधले.

Rajiv kumar
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, कटुता संपवली पाहिजे : राऊतांची भूमिका!

शुक्रवार पर्यंत प्रदर्शन :

विद्यापीठाच्या मार्बल हॉलमध्ये शुक्रवार (ता.११) पर्यंत प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनातून मतदार नावनोंदणी, ऑनलाइन नावनोंदणी, मतदान पत्रक, डिजिटल मतदान पत्रक, मतदान अधिकार याबद्दल चित्रांच्या माध्यमातून आकर्षक अशी माहिती देण्यात आली आहे. आभासी मतदान केंद्र, भारतीय निवडणुकीवर आधारित फ्लिप-बुक निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांवर आधारित स्वतंत्र विभाग, मतदार नोंदणीचे बॅकलिट्स, लोकशाहीची भिंत, जनजागृतीपर गाणी या सर्वांचा या प्रदर्शनात समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com