Maharashtra Budget Session : इंदापूरच्या इतिहासाला मिळणार झळाळी; मालोजीराजांची गढी होणार पर्यटन स्थळ

Dattatray Bharane : संवर्धन आणि विकासासाठी मिळणार दोन कोटींचा निधी
Mangal Prabhat Lodha, Dattatray Bharne
Mangal Prabhat Lodha, Dattatray BharneSarkarnama

Indapur News : इंदापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांची गढी आहे. या गढीला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळणार आहे. सात दिवसात त्याबाबतचा निर्णय घोषित केला जाणार आहे. तसेच ऐतिहासिक गढीच्या संवर्धनासाठी तातडीने दोन कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्‍वासन राज्याचे पर्यटन मंत्री मंगल लोढा यांनी दिले. यामुळे मालोजीराजांचा इतिहासाची नवीन पिढीला ओळख होईल. यामुळे इतिहासाची साक्ष असणाऱ्या इंदापूर शहराच्या इतिहासाला उजाळा मिळणार असून इंदापूरचे नाव देशाच्या नकाशावर झळकणार आहे.

इंदापूरचे आमदार व माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी इंदापूरमधील मालोजीराजांच्या गढीची लक्षवेधी सूचना मांडून शासानाचे लक्ष वेधले. भरणे यांनी अधिवेशनामध्ये सांगितले की, "छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांना निजामशाहीने इंदापूर शहर वतन दिले होते. मालोजीराजे शेवटच्या क्षणापर्यत इंदापूर शहरामध्ये वास्तव्यास होते. १६०६ मध्ये झालेल्या इंदापूरातील लढाईमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झाले."

Mangal Prabhat Lodha, Dattatray Bharne
Jitendra Awhad : तुमची मुलगी ही आमचीही मुलगी; आव्हाडांना फडणवीसांकडून धीर; केली मोठी घोषणा!

भरणे यांनी पुढे इंदापूरच्या संस्कृतीबाबतही माहिती दिली. भरणे म्हणाले, "मालोजीराजांच्या गढीसमोर इंद्रेश्‍वराचे मंदिर होते. मालोजीराजांच्या दिनक्रमाची सुरुवात इंद्रेश्‍वराच्या दर्शनाने होत होती.आजही इंदापूरमध्ये इंद्रेश्‍वराचे मंदिर आहे. तेथे मोठी यात्रा भरत असून ते इंदापूरचे ग्रामदैवत आहे. या सर्व घटनांचा उल्लेख शिवभारत ग्रंथामध्ये आहे."

यानंतर भरणे यांनी गढीच्या संवर्धनाची गरज असल्याचे सांगितले. भरणे म्हणाले की, "इंदापूरमधील आजची जुनी तहसील कचेरी मालोजीराजेंची गढी आहे. या गढीचे संवर्धन करुन जुने बुरुजांचे पुनर्जीवन करुन मालोजीरांच्या स्मारक उभारावे. गढीचे पुनर्जीवन करावे. पादुकासाठी दगडी चबुतरा उभारावा."

Mangal Prabhat Lodha, Dattatray Bharne
Congress News : केंद्र सरकार मेले आहे का? राज्याच्या सीमाभागात आरोग्य सुविधा देण्यावरून काँग्रेस आक्रमक

भरणे यांच्या प्रश्नाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी उत्तर दिले. लोढा म्हणाले की,"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले व गडसंवर्धनासाठी ३५० कोटींची तरतूद केली आहे. इंदापूरातील मालोजीराज्यांच्या गढीसाठी तातडीने दोन कोटींची तरतूद करण्यात येईल."

मालोजीराजांच्या गढीसाठी घोषणा केल्यानंतर जागा ताब्यात घेणार असल्याचेही लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, "इंदापूरातील मालोजीराजांच्या गढीवर दोन महिन्यात बैठक घेतली जाईल. गढीच्या संवर्धनासाठी आराखडा तयार केला जाईल. त्या बैठकीला महसूल, पर्यटन, सांस्कृतिक विभागाचे मंत्री, अधिकारी उपस्थित राहतील. तसेच सात दिवसांत मालोजीराजेंची गढी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करुन सर्व जागा ताब्यात घेण्यात येणार आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com