Pune News| गणेश मंडळांना उच्च न्यायालयाचा दणका: ती याचिका फेटाळली

Pune News| High Court| पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीचा मुद्दा थेट उच्च न्यायालयात गेला होता
Pune News| High Court|
Pune News| High Court|

पुणे : पुण्यातील काही गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवरून उच्च न्यायालयात (High Court) एक याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. विसर्जन तोंडावर असताना स्वैर याचिका करणं चुकीचं असल्याचं सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले आहे.

पुणे शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक ही राज्यभरातील गणेश भक्तांच्या भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र असते. पुण्यातील हजारो गणपती मंडळे आकर्षक विसर्जन रथातून गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होतात. पण मनाच्या पाच गणपतींचं विसर्जनातच संपूर्ण दिवस संपून जातो. त्यामुळं इतर हजारो मंडळे ताटकळत राहातात. स्थानिक प्रशासनाकडे याबाबत अनेकदा याविषयी दाद मागूनही त्यांनी दखल न घेतल्याने पुण्यातील गणेश मंडळांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Pune News| High Court|
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार : भाजप-शिंदे गट-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीचा मुद्दा थेट उच्च न्यायालयात गेला होता. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी आधी मानाचे पाच गणपती जातील त्यानंतर लहान गणपती जाणार ही बंधनं का ? असा सवाल या मंडळांकडून उपस्थित करण्यात आला होता. तसेच, मानाचे गणपती मंडळांकडून इतर छोट्या-मोठ्या मंडळांना तुच्छतेची वागणूक देते, असा आरोपही करण्यात आला होता. शैलेश बढाई यांनी असीम सरोदे यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका केली होती. पण उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

1893 ला लोकमान्य टिळकांनी पुण्यात गणेशोत्सव सुरु केला. पण दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1894 ला आधी विसर्जन कोणी करायचं यावरून गणेश मंडळांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद लोकमान्य टिळकांपर्यंत पोहचला. त्यावर त्यांनी पुण्याचं ग्रामदैवत म्हणून विसर्जनाचा पहिला मान कसबा गणपती, ग्रामदेवता म्हणून दुसरा मान तांबडी जोगेश्वरी गणपतीचा असेल असं ठरवण्यात आलं. पुढे मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती, चौथा मान तुळशीबाग आणि पाचवा मान केसरीवाडा या गणेश मंडळांकडे असेल, अशी प्रथा रूढ झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in