'राज्याचे आरोग्य अडाण्यांच्या हातात' : तानाजी सावंतांवर जगतापांची बोचरी टीका

Prashanat Jagtap : नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी..
Prashant Jagtap
Prashant JagtapSarkarnama

पुणे : राज्याचे नवे आरोग्यमंत्री तानाजी सावंत सद्या चांगलेच चर्चेत आहेत. ससून रुग्णालयात रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आरोग्यमंत्र्यांच्या कानावर आली होती. त्या तक्रारीचा सोक्षमोक्ष करण्यासाठी खुद्द तानाजी सावंतच ससून रुग्णालयात पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर रुग्णालयात हाफकिनकडून औषधांचा साठा कमी होत असल्याची तक्रार डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांना ऐकवली. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी तातडीनं त्या हाफकिन नावाच्या माणसाकडून औषधं घेणं बंद करण्याचे तोंडी आदेश दिले. या आदेशानं डॉक्टरही कोड्यात पडले. सोशल मीडियावर सध्या सावंत यांच्या संदर्भातल्या एका बातमीचं कात्रण व्हायरल होत आहे. या बातमीमध्ये तानाजी सावंत यांना हाफकीन ही व्यक्ती आहे की संस्था याची माहिती नसल्याचा उल्लेख आहे. यावर आता राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे.

"नशीब कोरोनाच्या काळात राजेश टोपे राज्याचे आरोग्य मंत्री होते. आत्ताचे महाशय असते तर व्हॅक्सिन साठी 'सिरम' नावाच्या माणसाला शोधत बसले असते. राज्याचे आरोग्य अडाण्यांच्या हातात आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, अशा शब्दात प्रशांत जगताप यांनी सावंत यांच्यावर टीका केली आहे.

Prashant Jagtap
'तुमचे नगरसेवक पद घालवतो..' २५ लाखांची खंडणी : आरटीआय कायद्याचा गैरवापर ऐरणीवर

तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधं घेता ते आधी बंद करा, अशा शब्दांत सावंतांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना झापल्याचा उल्लेख या बातमीच्या कात्रणात आहे. पुढे या बातमीत लिहिलंय की डॉक्टरांना हे ऐकून हसू आवरेना, शेवटी मंत्र्यांच्या पीएनी त्यांना कानात सांगितलं की, हाफकीन ही शासकीय संस्था आहे, माणूस नाही. तेव्हा त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

Prashant Jagtap
भाजपवाल्यांना पवार कुटुंबियांचे कामच उत्तर देईल! राष्ट्रवादीचे नेते आक्रमक

यावरुन आता नेटकरी सावंतांची चांगलीच खिल्ली उडवत आहेत.आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना शासकीय औषध संस्थाही माहित नाही, यावरुन त्यांना टोला लगावला जात आहे. अनेक जण या बातमीचं कात्रण व्हायरल करत आहेत. विविध राजकीय नेत्यांकडून यावर टीका करणयात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com