आनंदाची बातमी : CHB वर काम करणाऱ्या प्राध्यापकांना UGC च्या निकषाने मानधन

‘नॅक’चे मानांकन असणाऱ्या महाविद्यालयांना ५० टक्के पद भरतीला परवानगी मिळणार.
आनंदाची बातमी : CHB वर काम करणाऱ्या प्राध्यापकांना  UGC च्या निकषाने मानधन
Ajit PawarSarkarnama

पुणे : राज्यातील महाविद्यालयातून तासिका (CHB) तत्वावर शिकविणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) निकषानुसार वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला.

Ajit Pawar
भगिरथ भालकेंनी शब्द फिरवला; ऊसबिल देण्याआधीच उमेदवारी अर्ज भरला!

विद्यापीठांचे आकृतिबंध तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदचे (NAAC) मानांकन असणाऱ्या महाविद्यालयांना ५० टक्के पद भरतीला परवानगी दिली जावी. गुणवत्तापूर्ण शिक्षणात कोणतीही तडजोड करु नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

Ajit Pawar
काँग्रेसचे आमदार क्रॉस व्होटींग करणार? सचिन पायलट म्हणाले...

वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रीया व तासिका तत्वावर (सीएचबी) कार्यरत प्राध्यापकांच्या दरमहा मानधनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सहभागी झाले होते.

Ajit Pawar
बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला दांडी; हे आमदार देणार शिवसेनेची साथ

आमदार सुधीर तांबे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार किरण सरनाईक, आजी आमदार अमरसिंह पंडीत, संजय खोडके, सामान्य प्रशासन विभागाचे (सेवा) अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने, महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टिचर्स असोसिएशनचे (मुप्टा) सुनिल मगरे आदी बैठकीला उपस्थित होते.

Ajit Pawar
जानकरांच्या आमदाराचा भाजपला शॉक : ‘आम्हाला गृहीत धरू नका!’

राज्यातील महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच महाविद्यालयातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील तासिका तत्वावर (सीएचबी) शिकविणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निकषानुसार वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो ‘सीएचबी’ तत्वावर शिकविणाऱ्या प्राध्यापकांना होणार आहे.

राज्यातील विद्यापीठांचे आकृतीबंध तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देताना आकृतिबंध पूर्ण झालेल्या मात्र ‘नॅक’चे मानांकन मिळविणाऱ्या महाविद्यायालयातच ५० टक्के पद भरतीला मान्यता देण्यात येणार आहे. राज्यातील महाविद्यालयीन शिक्षणाच्या दर्जात कोणत्याही परिस्थितीत तडजोड करता कामा नये अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in