महाआघाडीच्या ‘सेलिब्रेशन’ला कॉंग्रेसचे बागवे फिरकलेच नाहीत

कोरोना काळातील संकट सरकारने मोठ्या हिमतीने पार करून सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम केले आहे.
 महाविकास आघाडी
महाविकास आघाडीसरकारनामा

पुणे : महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुढाकाराने पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. मात्र, या पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहात शहर कॉंग्रेसने आघाडीतील बिघाडी कायम ठेवल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

 महाविकास आघाडी
कुणाला घाबरणार नाही : असं का म्हणाले चंद्रकांत पाटील

राज्य सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने राज्य सरकारचे अपयश जनतेसमोर आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने पुण्यात सलग सात दिवस विविध नेत्यांच्या पत्रकार परिषदा झाल्या.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज यातील शेवटची पत्रकार परिषद झाली. सात दिवसात भाजपाने राज्यभर अशा ७८ पत्रकार परिषदा घेतल्या. भाजपाच्या या पत्रकार परिषदांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुढाकाराने महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आज झाली.या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राज्याचे प्रवक्ते अंकुश काकडे, शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख व शिवसेनेचे शाम देशपांडे उपस्थित होते.

 महाविकास आघाडी
चंद्रकांत पाटील यांच्याशी अमित शाह काय बोलले ?

शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांना या पत्रकार परिषदेचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, पत्रकार परिषदेला अध्यक्ष बागवे किंवा त्यांचा कुणीही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही.महाविकास आघाडी सरकारमधील तीन्ही घटक पक्षांच्यावतीने ही पत्रकार परिषद घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला.

राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात मोठे काम केले आहे. विशेषत: कोरोना काळातील संकट सरकारने मोठ्या हिमतीने पार करून सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम केले आहे, असे त्यांनी सांगितले. विरोधक केवळ टीका करण्याचे काम करीत आहेत. भाजपाची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेत केवळ भ्रष्टाचार सुरू असून सामान्य पुणेकरांच्या हिताशी भाजपाला कसलेच देणेघेणे नसल्याची टीका यावेळी जगताप यांनी केली.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com