विसर्जन मिरवणुकीला उशीर; पोलीस आयुक्तांनी खापर फोडले मानाच्या मंडळावर

Ganesh Visarjan : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल ३१ तास चालली
Pune Police Commissioner Amitabh Gupta
Pune Police Commissioner Amitabh Guptasarkarnama

Ganesh Visarjan : पुणे : मानाच्या गणपती मंडळानी विसर्जन मिरवणुकीसाठी खूप वेळ घेतल्याने संपूर्ण विसर्जन मिरवणुकीला उशीर झाल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज मान्य केले. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार मिरवणूक 29 तासात संपली तर प्रत्यक्षात मंडळांच्या माहितीनुसार मिरवणुकीत शेवटचा गणपती विसर्जित व्हायला तब्बल 31 तास लागल्याचे सांगण्यात येत आहे.

विसर्जन मिरवणुकीतील मंडळांमधले वाढलेली अंतर, ढोल ताशा पथकाची प्रचंड संख्या यामुळे प्रामुख्याने उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना संकटामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर पुण्यात विसर्जन मिरवणूक पार पडली. परिणामी मंडळांचा आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह मिरवणुकीत जाणवला.

Pune Police Commissioner Amitabh Gupta
Pune Police| पोलिसांच्या नियंत्रणाअभावी लांबली पुण्यातली मिरवणूक

डीजेवरून मोठ्या आवाजात वाजवली जाणारी गाणी, ढोल ताशा पथकांची मोठी संख्या. एकाच ठिकाणी उभे राहून चौकाचौकात करण्यात येणारे स्थिर वादन आणि एका ढोल ताशा पथकात असलेली ढोल ताशाधारकांची मोठी संख्या यामुळे प्रत्येक मंडळाची विशेषतः मानाच्या मंडळाच्या मिरवणुकीला उशीर झाला.

मिरवणुकीमध्ये काही किरकोळ वाद वगळता निवडणूक अत्यंत शांततेत पार पडल्याचा दावा पोलीस आयुक्त गुप्ता यांनी केला. मोबाईल चोरीच्या घटना या वर्षी मोठ्या प्रमाणात झाल्या असून त्याचा नेमका आकडा पोलिसांकडून अद्याप स्पष्ट व्हायचे बाकी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांना सूट दिली होती. पुण्यात घेतलेल्या बैठकीत तशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे ढोल ताशा पथकांच्या संख्येवरती कोणताही निर्बंध नव्हते.

Pune Police Commissioner Amitabh Gupta
'न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवणाऱ्या आयुक्तांना व जिल्हाधिकाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊ!'

निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव व्हावा या शिंदे यांच्या आदेशामुळे पुण्याच्या पोलिसांचे हात बांधल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशामुळे काही करता येत नाही, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतरही कायद्याच्या चौकटीत राहून पोलीस आयुक्तांनी मानाच्या गणपतींवरती काही प्रमाणात नियंत्रण ठेवले असते, तरी मिरवणूक खूप कमी कालावधीत संपली असती, अशी भावना पुणेकर व्यक्त करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com