‘भोंग्याचा पहिला बळी’; वसंत मोरेंची हकालपट्टी : पुणे मनसेचे नवे अध्यक्ष साईनाथ बाबर

गेले दोन-चार दिवस या विषयावर पक्षात वाद सुरू होता.
Vasant More news, Pune MNS News, Sainath Babar news
Vasant More news, Pune MNS News, Sainath Babar newsSarkarnama

पुणे : मशिदीवरील भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांना पदावरून हटवण्यात आले असून त्यांच्या जागी माजी नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची नेमणूक करण्यात आली आहे.भोंग्यांच्या राजकारणावरून मनसेतच मतभेद निर्माण झाले असून मोरे यांच्या रूपाने पहिला राजकीय बळी गेला आहे. (Pune MNS News)

Vasant More news, Pune MNS News, Sainath Babar news
राज ठाकरेंच्या 'उत्तरसभे'ला ठाण्याच्या पोलिसांकडून दणका ; मनसे ठाम

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी केली होती. त्यावर राज्य तसेच देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनीही यास विरोध केला होता. पक्षाचे पुण्यातील शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीदेखील या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत मला माझ्या प्रभागात शांतता हवी, असल्याचे म्हटले होते.

Vasant More news, Pune MNS News, Sainath Babar news
राज्याच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; निवडणुकांचे भवितव्य २१ एप्रिलला ठरणार

गेले दोन-चार दिवस या विषयावर पक्षात वाद सुरू होता. या पाश्‍र्वभूमीवर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांनी आज मुंबईत बोलावले होते. राज ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर वसंत मोरे यांना पदावरून हटवत माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची नवे शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे आज दुपारी जाहीर करण्यात आले.

माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ''सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही वसंत मोरे यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com