Shivsena News : निवडणूक आयोगाने गंभीर चूक केली; कायदेतज्ज्ञांचे महत्त्वाचे विधान

Central Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला.
Maharashtra Political Crises
Maharashtra Political Crises Sarkarnama

Central Election Commission News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णायामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. आयोगाच्या या निकालानंतर आगामी काळात काय-काय गोष्टी बदलणार याबाबत तर्कवितर्क बांधण्यात येत आहेत. या निर्णयावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी मत व्यक्त केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर आपला निकाल द्यायला नको होता. आयोगाने मोठी चूक केली आहे, असे मत बापट यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, आयोगाने दिलेला निर्णय म्हणजे राजकीय भूकंप आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे काय परिणाम होणार, या निर्णयाचा फायदा तसेच तोटा किती झाला, हे काळच ठरवेल.

Maharashtra Political Crises
Sanjay Raut : 'या राजकीय हिंसाचारात शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेईल' : राऊतांचा विश्वास!

सर्वोच्च न्यायालय आगामी चार ते पाच दिवसांत आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या खटल्याचा निकाल देऊ शकते. आता या खटल्याची सलग सुनावणी होणार आहे, असेही बापट म्हणाले. सध्याचे पाच सदस्यीय घटनापीठ आमदारांच्या अपात्रतेचा व विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबतचा खटला कोणत्याही क्षणी सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याचाही निर्णय घेऊ शकते, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Maharashtra Political Crises
Shivsena Symbol : शिवसेनेची कार्यकारणी लोकशाहीला धरूनच ; ठाकरेंच्या खासदाराचा दावा!

विद्यमान पाच सदस्यीय घटनापीठाने हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडापीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला, तर हा खठला वर्षभर चालेल. मात्र, सध्याच्याच पाच न्यायमूर्तींनी या खटल्यावर निकाल दिला व तो आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात लागला, तर मग गंभीर परिस्थिती निर्माण होईल. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या अगोदरच हा निर्णय देऊन गंभीर चूक केली, असे उल्हास बापट म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com