निवडणूक खर्च वेळेत सादर न करणे भोवले : सरपंच, उपसरपंचाने गमावले पद

तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती.
निवडणूक खर्च वेळेत सादर न करणे भोवले : सरपंच, उपसरपंचाने गमावले पद
Gram Panchayat electionsarkarnama

कुरकुंभ (जि. पुणे) : दौंड तालुक्यातील कुरकुंभ ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचांना विभागीय आयुक्तांनी दणका दिला आहे. निवडणूक खर्च वेळेत व विहित नमुन्यात सादर न केल्याने दोघांनाही अपात्र ठरविण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती.

सरपंच राहुल भोसले व उपसरपंच विनोद शितोळे यांना आपले पद गमवावे लागले आहे. त्यांनी 2018 - 2023 या पंचवार्षिक निवडणुकीचा खर्च वेळेत व विहित नमुन्यात सादर केला नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सादर केलेली बिले, खर्चासाठी बँकेत उघडण्यात आलेल्या खात्यातून खर्च केला नाही. प्रतिज्ञापत्र, बिलांवर तारखा व सह्या नसल्याचेही आढळून आले.

Gram Panchayat election
देशमुखांची दिवाळी कोठडीत पण फराळ घरचा!

त्याविरोधात संदीप भागवत यांनी ग्रामपंचायत अधिनियम 14 ( ब ) मधील तरतुदीचा भंग झाल्यामुळे सरपंच राहुल भोसले यांच्याविरोधात तक्रार केली. तर संदीप साळुंके यांनी सदस्य व विद्यमान उपसरपंच विनोद शितोळे यांना अपात्र ठरविण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. पण, जिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर भागवत व साळुंके यांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली.

विभागीय आयुक्तांकडे झालेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूचे जबाब ऐकून घेत 29 ऑक्टोबर 2021 रोजी निकाल दिला. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 16 ( 2 ) अन्वये हा निकाल देण्यात आला आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूचे जबाब घेऊन भागवत व साळुंके यांचे अपिल मान्य करण्यात आले. तसेच याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांनी 22 जुलै 2019 रोजी दिलेला आदेशही रद्द करण्यात आला.

Gram Panchayat election
देवेंद्रजी, पंधरा कोटींच्या 'त्या' पार्ट्यांचा आयोजक कोण? मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट

विभागीय आयुक्तांनी सरपंच व उपसरपंचाला अपात्र ठरविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाबाबत राहुल भोसले व विनोद शितोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा आदेश अद्याप मिळाला नसल्याचे सांगितले. आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in