महापालिकेत समाविष्ट गावातील वादग्रस्त नोकरभरतीचा तपास होणार एका महिन्यात

जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २१ ग्रामपंचायती ३० जून २०२१ ला महापालिकेत समाविष्ट झाल्या आहेत.
पुणे महानगरपालिका भवन
पुणे महानगरपालिका भवन सरकारनामा

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे हेच पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २१ ग्रामपंचायतींमधील वादग्रस्त नोकरभरती प्रकरणाची चौकशी पूर्ण करणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. ही चौकशी करण्यासाठी मुंडे यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी परवानगी दिली आहे. या मंजुरीचे पत्र अग्रवाल यांनी सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना पाठविले आहे.

या चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. परंतु मध्यंतरी या समितीचे अध्यक्ष मुंडे यांची जिल्हा परिषदेतून अन्यत्र बदली झाली. या बदलीमुळे ग्रामपंचायत कर्मचारी वादग्रस्त भरती प्रकरणाची चौकशी होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तो संभ्रम या परवानगीमुळे दूर झाला आहे.

पुणे महानगरपालिका भवन
महापौर मोहोळांचा Happy Birthday : पुण्यासाठी ठरणार रक्तदान महासंकल्प दिवस

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील वादग्रस्त कर्मचारी भरतीची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. या पातळीवर चौकशी समितीचे अध्यक्ष बदलणे अशक्य नाही. त्यामुळे मुंडे यांची बदली झाली असली तरी ही चौकशी पूर्ण करण्यासाठी त्यांनाच परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्यावतीने राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त अग्रवाल यांच्याकडे एक नोव्हेंबर २०२१ ला पत्राद्वारे करण्यात आली होती.

पुणे महानगरपालिका भवन
पतित पावन संघटना निवडणुकीच्या रिंगणात खरोखरच उतरली तर...

जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २१ ग्रामपंचायती ३० जून २०२१ ला महापालिकेत समाविष्ट झाल्या आहेत. या ग्रामपंचायतींनी कर्मचाऱ्यांच्या भरतीत गैरप्रकार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सीईओ आयुष प्रसाद यांनी १२ जूलै २०२१ ला ही चौकशी समिती स्थापन केली होती. त्यानंतर १४ जुलैपासून या समितीने प्रत्यक्ष काम सुरु केले होते.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांची महिला व बालकल्याण विभागात परीविक्षा अधीक्षक या पदावर बदली झाली आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण करण्यासाठी या विभागाची परवानगी मिळणे आवश्‍यक होते. त्यानुसार या विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी काही अटी व शर्तींसह ही परवानगी दिली आहे. त्यानुसार परीविक्षा अधीक्षक कार्यालयात बसूनच येत्या महिनाभरात ही चौकशी पूर्ण करण्याची अट अग्रवाल यांनी घातली आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com