Jejuri Devasthan Trustee Dispute : साडेतीनशे जेजुरीकरांनी मुलाखती दिल्या, निवडले एकाला : विश्वस्त मंडळाचा वाद कोर्टात जाणार

Jejuri News : बाहेरच्या पाच विश्वस्तांची निवडीचे निकष काय? जेजुरीकरांचा प्रश्न
Agitation in Jejuri
Agitation in JejuriSarkarnama

Martand Devsansthan Trustee : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या सात विश्वस्तांच्या निवडीवरून वाद चिघळला आहे. ही निवड पुणे सहधर्मादाय आयुक्तांनी केली आहे. त्यांनी देवसंस्थानच्या सातपैकी पाच बाहेरील विश्वस्तांची निवड केली आहे. जेजुरीबाहेरील निवडलेल्या या विश्वस्तांच्या निवडीचा जेजुरी खांदेकरी -मानकरी ग्रामस्थ मंडळाच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निषेध केला आहे. आंदोलन करून आपला रोषही व्यक्त केला.

या विश्वस्तमंडळावर वर्णी लागण्यासाठी जेजुरीतील (Jejuri) सुमारे साडेतीनशे नागरिकांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यातील फक्त एका व्यक्तीला सातजणांच्या विश्वस्तमंडळावर नेमण्यात आले. तर एक जण परिसरातील आहे. इतर पाचजण जेजुरीबाहेरील आहेत. त्यास जेजुरीकरांनी तीव्र विरोध केला. खंडोबा देवस्थानवर करण्यात आलेल्या सात पैकी पाच विश्वस्तांनी गुरुवारी (ता. २५) रात्री उशिरा पदभार स्वीकारला. संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी त्यांच्याकडे कार्यभार सोपवला.

Agitation in Jejuri
Solapur Politic's फडणवीसांनंतर अजित पवारही सोलापूरच्या दौऱ्यावर : काँग्रेस, भाजपनंतर राष्ट्रवादीतही राजकीय घडामोडींना वेग

या निवडीचा निषेध म्हणून शुक्रवारी (ता. २६) पुणे-पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन (Agitation) करण्यात आले. त्यानंतर जेजुरीत ग्रामस्थांनी या विश्वस्तमंडळाविरोधात चक्रीउपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता उपोषण सुरू करण्यात आले आहे. या मंडळाला सहकार्य न करण्याचा ठरावही ग्रामस्थांनी मंजूर केला आहे. दरम्यान, सहधर्मदाय आयुक्तांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले आहे. त्यात हे विश्वस्तमंडळ कुठल्या निकषांच्या आधारावर निवडले, त्याची माहिती मागितली आहे. अद्याप आयुक्तांनी उत्तर दिले नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

Agitation in Jejuri
Pay-CM and G-Pay : कुठं 'पे-सीएम' तर कुठं 'जी-पे'; महाराष्ट्रातील टक्केवारी माहीत आहे का?

या विश्वस्तमंडळाच्या निवडीबाबत 'सरकारनामा'शी जेजुरीतील माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी टीका केली. सोनवणे म्हणाले, "जेजुरीत वर्षभरात सात यात्रा भरविल्या जातात. त्या यात्रांचे विशेष असे महत्व असते. त्यामागील रुढी, परंपरा स्थानिकांना चांगल्या माहिती आहेत. बाहेरच्या लोकांना त्यातील बारकावे माहिती नाहीत. ते फक्त खुर्चीवरून कारभार करतील. यातून चुकीचे निर्णय घेऊन लोकांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे."

Agitation in Jejuri
Sanjay Shirsat on Sanjay Raut News : राऊतांनी जे तिकडे आहेत त्यांची काळजी करावी, त्यांना सांभाळावे..

सोनवणे यांनी या प्रकरणाबाबत पुढे कोणते निर्णय घेण्यात येतील, याबाबतही माहिती दिली. सोनवणे म्हणाले, "विश्वस्तमंडळावर जाऊन सेवा करण्याची संधी मिळेल या हेतूने सुमारे साडेतीनशे जेजुरीकरांनी मुलाखती दिल्या. त्यातील फक्त एकालाच संधी दिली. इतरांना कुठल्या निकषावर निवडले, याची माहिती सहधर्मदाय आयुक्तांकडून मागविली आहे. त्याबाबत ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले आहे. यानंतर या निवडीबाबत ग्रामस्थांच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com