मुख्यमंत्री शिंदे अन् डुप्लिकेट शिंदेंचा वाद पोहचला उच्च न्यायालयात

Eknath Shinde : मानेंवर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.
Crime News , Vijay Mane
Crime News , Vijay ManeSarkarnama

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासारखा चेहरा दिसत असणारे आणि त्यांच्यासारखाच पेहराव परिधान करत डुप्लिकेट सीएम म्हणून ओळख मिरवत असलेले विजय माने यांच्यावर मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणयात आला. मात्र आपल्यावरील दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी मानेंनी ॲड.असीम सरोदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केल्याची माहिती मिळत आहे. (Crime News , Vijay Mane)

Crime News , Vijay Mane
मोठी बातमी : उद्योगपती गौतम अदानींनी घेतली उद्धव ठाकरेंची गुप्त भेट

मुख्यंमंत्री शिंदेंची समाजामध्ये प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी मानेंवर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये IPC 419-511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप त्यांना अटक झालेली नाही. (Crime News)

डुप्लिकेट सीएम म्हणून वावरत असलेले विजय मानेंनी आरोपी शरद मोहोळ सोबत एक फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तसेच मुख्यमंत्र्यांचा वेश परिधान करत अनेक ठिकाणी माने नाचले होते.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आणि यावरून ही कारवाई करण्यात आली होती. यावरून माने यांनी आपली बाजू मांडली होती आणि आपल्यावरील गुन्हा रद्द करावा, अशी मागणी माने यांनी केली होती. आता त्यांनी याविरोधात अॅड. सरोदे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे समजते.

Crime News , Vijay Mane
पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात घुमणार भजन,कीर्तनचा आवाज; वारकऱ्यांचा लढा यशस्वी

दरम्यान, सत्तांतरानंतर मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर माने यांनी शिंदे यांच्यासारखा चेहरा आणि दाढी असल्याने त्यांच्यासारखे कपडे घालून ते डुप्लिकेट सीएम म्हणून मिरवत होते. यामुळे ते लोकप्रिय देखील होत होते. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवामध्ये तर त्यांना आरतीसाठी देखील आमंत्रीत केलं जात होते. याच लोकप्रियतेचा फायदा घेत मानेंनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट देखील घेतली होती. मात्र, त्यांना आरोपी मोहोळ सोबतचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल करणं असो किंवा त्यांचं सार्वजनिक ठिकाणी नाचनं चांगलच अंगलट आलं आहे.

याचकरणावरून त्यांच्यावर मुख्यमंत्र्याची बदनामी केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांच्या उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचीकेवर काय निर्णय येतो हे पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in