Amit Shah यांच्या मनात काय? : ‘गुजरात पॅटर्न’च्या चर्चेने राज्यातील नेत्यांची झोप उडाली

केंद्रातील नेत्यांनी गुजरात पॅटर्न (Gujrat Pattern) राबविला तर काय कारायचे ही भीती पक्षातील अनेक नेत्यांमध्ये आहे.
Devendra Fadanvis| Eknath Shinde|Amit Shaha
Devendra Fadanvis| Eknath Shinde|Amit ShahaSarkarnama

पुणे : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चेने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde And Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तब्बल ३५ दिवस उलटले. अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार होत नाही.यातच मंत्रीमंडळ बनविताना ‘गुजरात पॅटर्न’ (Gujrat Pattern) राबविण्याच्या चर्चेने भाजपातील इच्छुकांची झोप उडाली आहे.

Devendra Fadanvis| Eknath Shinde|Amit Shaha
भाजपच्या सुभाष देशमुखांना झटका : ग्रामपंचायतींमधील सत्ता शिवसेना-काँग्रेसने हिसकावली

२०१९ साली गुजरातमध्ये नवे मंत्रीमंडळ बनवताना त्यावेळच्या कोणत्याही मंत्र्याला न घेता पूर्णपणे नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी या ‘गुजरात पॅटर्न’ची देशभर चर्चा झाली होती. तोच पॅटर्न आता महाराष्ट्रात भाजपा आपल्या मंत्र्यांबाबत राबविणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झाल्याने पक्षातील इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.गुजरातप्रमाणे तंतोतंत जरी हा पॅटर्न राबविता आला नाही तरी किमान साठ टक्के नवे व चाळीस टक्के जुने चेहरे असा एक दुसरा पर्याय असल्याचे सांगण्यात येत आहे.

Devendra Fadanvis| Eknath Shinde|Amit Shaha
बार्शीत राजेंद्र राऊतांचीच हवा : दोन्ही ग्रामपंचायतींवर फडकवला विजयाचा झेंडा!

केंद्रातील नेत्यांनी गुजरात पॅटर्न राबविला तर काय कारायचे ही भीती पक्षातील अनेक नेत्यांमध्ये आहे. चाळीस टक्के जुने चेहरे घ्यायचे ठरले तरी त्यात काही ठराविक नेत्यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे. परिणामी दुसऱ्या फळीतील अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. दुसरीकडे गुजरात पटर्न यावा, असे नव्या तरूण चेहऱ्यांना मनातून वाटत आहे. मात्र, पक्षातील सध्याची स्थिती पाहता नवे किंवा जुने कोणतेच नेते मंत्रीमंडळातील समावेशाबाबत चकारशब्द काढत नाहीत.

अपात्र आमदारांच्या संदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर सोमवारी निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे मंत्रीमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त लांबत चालला आहे. आता नवा मुहूर्त सोमवारनंतरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रीमंडळाच्या लांबलेल्या विस्तारावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह जवळपास सर्वच विरोधी नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून सरकारला धारेवर धरले आहे. सर्व बाजूंनी टीका होत असली तरी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागतो यावर मंत्रिमंडळाचा विस्तार अवलंबून असल्याचे भाजपातील सूत्रांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in