राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्येला ओहोटी

राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 30 हजार 265 पर्यंत कमी झाली होती. तीच रुग्णसंख्या आता 28 हजार 631 झाली आहे.
Rajesh tope
Rajesh tope

पुणे : कोरोना उद्रेकाच्या पहिल्या लाटेपेक्षाही ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 30 हजार 265 पर्यंत कमी झाली होती. तीच रुग्णसंख्या आता 28 हजार 631 झाली आहे.

राज्यात गेल्या दीड वर्षातील सर्वांत कमी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या नोंदली जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या उद्रेक नियंत्रणात येत असल्याचे आशादायक चित्र निर्माण होत आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. अजूनही कोरोनाचा संसर्ग झालेल्या नवीन रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपायायोजना सुरू ठेवल्या पाहिजे. मास्क, सॅनिटाझर आणि सोशल डिस्टसिंग या त्रिसूत्रीचा वापर करून कोरोनाला प्रतिबंध करता येतो, असे आतापर्यंत दिसून आले आहे.

Rajesh tope
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उद्या पुणे पालिकेत

कोरोनाचा संसर्ग झालेल्या एक हजार 715 रुग्णांचे निदान आज राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झाले. त्यामुळे हा धोका कायम असल्याचे स्पष्ट होते. राज्यात गेल्या वर्षी 9 मार्चपासून आतापर्यंत 65 लाख 91 हजार 697 रुग्णांना कोरोना झाला. कोरोना संसर्गाचा हा दर आता 10.8 टक्क्यांपर्यंत कमी झाला असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.

Rajesh tope
पुणे महापालिका निवडणुकीकडे अमित शहांचे आहे लक्ष

राज्यात पहिल्या लाटेच्या वेळी 18 सप्टेंबर 2020 रोजी सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण होते. ही संख्या तीन लाख 887 होती. त्यानंतर पहिली लाटेची तीव्रता कमी झाली. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2021 पर्यंत अॅक्टिव्ह रुग्ण 30 हजार 265 पर्यंत कमी झाले होते. मात्र, त्या दिवसापासून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली. अवघ्या दोन महिन्यांमध्ये म्हणजे एप्रिलअखेरपर्यंत ही संख्या सहा लाख 99 हजार 858 पर्यंत वाढली. ही राज्यातील सर्वाधिक कोरोनाच्या सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ठरली. त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख कमी होत गेला. आता सहा महिन्यांमध्ये ही संख्या 28 हजार 631 पर्यंत कमी झाल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

गेल्या सतरा दिवसातील रूग्णसंख्या (तारीख आणि रूग्णसंख्या या प्रमाणे)

तारीख ... ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या

1 ... 36371

2 ... 35955

3 ... 35888

4 ...33637

5 ... 33159

6 ... 33181

7 ... 33397

8 ... 33011

9 ... 33006

10 ... 33449

11 ... 32115

12 ... 30525

13 ... 29555

14 ... 29560

15 ... 29782

16 ... 29627

17 ... 28331

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com