नव मतदारांसाठी महत्वाची बातमी; आठ डिसेंबरपर्यंत मुदत...

Important news for new voters : नव मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी
 voters Latest News
voters Latest NewsSarkarnama

पुणे : मतदार यादीत अद्याप नाव समाविष्ट नसलेल्या १८ वर्षांवरील पात्र व्यक्तींना नाव नोंदविण्यासाठी येत्या आठ डिसेंबरपर्यंत नमुना अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली. त्यामुळे नव मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळणार आहे. (voters Latest News)

१८ वर्षांवरील व्यक्तींना मतदार (voting) यादीत नाव नोंदविता येणार आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाचा छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्यानुसार आठ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येत आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी समुदाय, देहव्यवसाय करणाऱ्या महिला आणि भटक्या व विमुक्त जमातींच्या व्यक्तींसाठी नियोजित ठिकाणी विशेष शिबीर होणार आहे.

 voters Latest News
Jayant Patil : जयंत पाटलांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट इशारा; म्हणाले...

तसेच, ३ आणि ४ डिसेंबर रोजी सर्व नागरिकांसाठी मतदान केंद्रावर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी नागरिकांनी शिबिरांमध्ये आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले आहे.

मतदार यादीत नाव असं नोंदवा

संकेतस्थळ nvsp.in मोबाईलमध्ये वोटर हेल्पलाईन (Voter Helpline App) डाऊनलोड करुन अर्ज क्रमांक ६ भरावा.

किंवा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in