पेट्रोल-डिझलच्या दरवाढीचे चक्र थांबता-थांबेना

गेल्या तीन दिवसापासून पेट्रोल-डिझलचे दर सातत्याने वाढत आहेत
पेट्रोल-डिझलच्या दरवाढीचे चक्र थांबता-थांबेना
Petrol rate HikeSarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेल्या तीन दिवसापासून पेट्रोल-डिझलचे दर सातत्याने वाढत आहेत.आज पुण्यात पेट्रोल १०८ रूपये ७६ पैशावर पोचले आहे.गॅसपाठोपाठ झालेल्या पेट्रोल-डिझलच्या दरवाढीने सामान्य नागरीक हैराण झाला असून काहीही करून सरकारने वाढत्या किंमतीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरीक करू लागले आहेत.

पुण्यात आज पेट्रोलचा दर १०८ रूपये ७६ पैसे लिटर, डिझल ९७ रूपये ५४ पैसे तर सीएनजी किलोला ५९ रूपये ५० पैसे या चढ्या दराने वाढत आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्व सामान्य नागरिकांसाठी ही वाढ चिंतेंचा विषय ठरत आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझलची दरवाढ सुरूच आहे.आज मुंबईत पेट्रोल 29 पैशांनी, तर डिझेल 38 पैशांनी महागले आहे. त्यामुळे पेट्रोल 109.25 तर डिझल 99.55 रुपयांना मिळत आहे.

Petrol rate Hike
कोरोना बळींसाठी सानुग्रह अनुदान : पुणे जिल्ह्यातील १९ हजार कुटुंबांना मिळणार प्रत्येकी ५० हजार

वाढत्या इंधन दरवाढीबद्दल राज्य किंवा केंद्र सरकारच्या यंत्रणेला विचारले असता इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडल्याचे सांगण्यात येते. मात्र, इंधनावर केंद्र आणि राज्य सरकारने लावलेले कर आणि अधिभार केंद्र आणि राज्य सरकार कमी करायला तयार नाही.केंद्र आणि राज्यांनी प्रत्येकी पाच रूपये कर कमी कला तर नागरीकांना डिझल आणि पेट्रोल लिटरला दहा रूपये कमी दराने मिळू शकते.

गेल्या महिन्यात ‘जीएसटी’ परिषदेची बैठक झाली. या बैठकीत पेट्रोल-डिझल जीएसटीत आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने ठेवला. मात्र, महारष्ट्रासह काही राज्यांनी त्यास विरोध केला. पेट्रोल-डिझलचा समावेश ‘जीएसटी’त केला तर राज्यात पेट्रोल व डिझल दोन्ही लिटरला किमान चाळीस रूपये कमी दराने मिळू शकते. महाराष्ट्रासह अन्य राज्य सरकारे महसूल कमी होण्याच्या भीतीने या प्रस्तावाला विरोध करीत आहेत.परिणामी इंधनाचे दर कमी होण्याऐवजी रोज वाढत आहेत.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.