आधी राष्ट्रवादीने आत्मपरीक्षण करावं, पुणे कॉंग्रेसचा सल्ला

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) वादाची आणखी एक ठिणगी
आधी राष्ट्रवादीने आत्मपरीक्षण करावं, पुणे कॉंग्रेसचा सल्ला

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) निवडणुकांना काहीच दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीतील धुसफूस थांबण्याची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाहीत. आता तर काँग्रेसने थेट राष्ट्रवादीलाच (NCP) आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या वादात आणखीन एक ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.

कॉंग्रेस (Congress) शहराध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagave) यांनी राष्ट्रवादीला आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. पीएमआरडीए निवडणूकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची (Shivsena) विनंती डावलत कॉंग्रेसने आपला उमेदवार उभा केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीने कॉंग्रेस (NCP) आघाडी धर्म विसरल्याची टिका केली होती. पीएमआरडीएच्या निवडणुकीचा वाद संपत नाही, तोच स्मार्ट सिग्नल व्यवस्थेला सिग्नल व्यवस्थेसाठी ५५ कोटी रुपये देण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादीने भाजपला दिलेला पाठिंबा काँग्रेसला चांगलाच खटकला आहे. स्मार्ट सिटीच्या सिंग्नल यंत्रणेवरील 55 कोटींच्या उधळपट्टीला मुख्यसभेत मान्यता देत भाजपशी हात मिळवणी करणाऱ्या आघाडीतील घटकपक्षांनी आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला रमेश बागवे यांनी दिला आहे.

आधी राष्ट्रवादीने आत्मपरीक्षण करावं, पुणे कॉंग्रेसचा सल्ला
राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरु होणार?

पीएमआरडीए (PMRDA) नियोजन समिती निवडणुकीत संख्याबळ नसतानाही काँग्रेसने आपला उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीत फूट पडली होती. परिणामी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी-सेनेचे नगरसेवक निवडून आले. यात कॉंग्रेसने आघाडी धर्म पाळला नसल्याचा आरोप राष्ट्रवादीने काँग्रेसवर केला होता. त्यातच आता स्मार्ट सिग्नल व्यवस्थेसाठी महापालिकेकडून स्मार्ट सिटीला ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय भाजपाने घेतला. या भाजपच्या निर्णयाला राष्ट्रवादीने साथ दिली आणि यावरूनच वादाची ठिणगी पडली.

त्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही यावर भाष्य केलं आहे. पुण्यात भाजपचं मोठे संख्याबळ आहे, असं असताना भाजपला रोखायचं असेल तर महाविकास आघाडीत एकजूट असणं आवश्यक आहे. हे सांगायला कोण्या राजकीय विश्लेषकाचीही गरज नाही. मात्र तसं होताना दिसत नाही. म्हणूनच महाविकास आघाडीची धुसफूस भाजपच्या पथ्यावर पडणार, ही चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरु लागली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in