पुण्यातील ऑडिओ क्लिप ऐकून नाना पटोले, अशोक चव्हाण यांनीही डोक्याला हात लावला..

मुख्यसभेत (PMC) येणारा प्रस्ताव टाळण्यासाठी आजची मुख्यसभा तहकूब करीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने (BJP) त्यांना मदत केली.
पुणे महानगरपालिका भवन
पुणे महानगरपालिका भवन सरकारनामा

पुणे : आपल्याच पक्षाच्या नगरसेवकाविरूद्ध असलेला ठराव मंजूर करण्यास विरोध न करण्याचा शब्द देणारी कॉंग्रेस नगरसेवकाची ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाल्याने कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये कोजागिरीच्या रात्री चांगलीच जुंपली. या दोघांच्या भांडणात मध्यममार्ग म्हणून महापालिकेच्या आजच्या मुख्यसभेत येणारा प्रस्ताव टाळण्यासाठी मुख्यसभा तहकूब करीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने त्यांना मदत केली.

‘‘ मुख्यसभेच्या कार्यपत्रिकेवर काँग्रेस नगरसेवकाच्या विरोधात असलेला प्रस्ताव मंजूर करा आमच्याकडून तीव्र विरोध होणार नाही," असा शब्द एका ज्येष्ठ व प्रमुख नगरसेवकाने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना दिला. मात्र या संभाषणााची क्लिप व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या या दोन नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद प्रदेश पातळीवरील नेत्यांपर्यंत पोचला. शेवटी हा वाद शांत करण्यासाठी बुधवारी होणारी मुख्यसभा तहकूब करून सत्ताधारी भाजपाने त्यांना मदत केली.

पुणे महानगरपालिका भवन
पुण्यात राष्ट्रवादी भाजपला विचारणार 'क्या हुआ तेरा वादा'?

महापालिकेची सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याची मुख्यसभा आज होती. कामकाज सुरू होताच काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी बांगलादेशात मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध म्हणून व यात केंद्र सरकारने भूमिका घेण्याची विनंती करावी अशी तहकुबी मांडली. मुख्यसभा अचानक का तहकूब झाली हे अनेक नगरसेवकांना कळाले नाही. तहकूब करताना पुढची सभा ऑक्टोबर महिन्यात घ्यायची की नोव्हेंबर महिन्यात घ्यायची यावरून सत्ताधारी व विरोधकात किरकोळ वाद झाले. अखेर २५ ऑक्टोबरला मुख्यसभा घेण्याचा निर्णय झाल्याने हा वादग्रस्त विषय काही दिवस पुढे ढकलला गेला. मात्र, रात्री झालेल्या काँग्रेसमधील राड्याची चर्चा मुख्यसभा तहकूब झाल्यानंतर महापालिकेत चांगलीच रंगली.

पुणे महानगरपालिका भवन
नितीन गडकरींचा सल्ला पुणे पालिका ऐकणार; ...पण बजेटमध्ये बसला तरच

वादाचा मूळ विषय असा आहे..

भवानी पेठेतील महापालिकेची मिळकत नगरसेवकाच्या संस्थेच्या ताब्यातून काढून घेण्याचा विषय ऑक्टोबर महिन्याच्या कार्यपत्रिकेवर आहे. यावरून भाजपा व काँग्रेसमधील दोन स्थानिक नगरसेवकांची टोकाची भांडणे आहेत. हा विषय भाजप नगरसेविकेने प्रतिष्ठेचा केला असून यासंदर्भात संबंधित नगरसेविका व काँग्रेसच्या वरिष्ठ नगरसेवकाची चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा विषय मंजूर करण्यास हरकत नाही, असे काही दिवसांपूर्वी सांगितले.

मंगळवारी रात्री यासंदर्भात भाजपाच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नगरसेवक व भाजपा नगरसेविकेचे पती यांच्यात काँन्फरन्स कॉलवर चर्चा झाली. त्यावेळी काँग्रेस नगरसेवकाने तुम्ही विषय मंजूर करा, मी दाखविण्यासाठी विरोध करेन असे सांगितले.

या संभाषणाची क्लिप ऐकल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकाने वरिष्ठ नगरसेवकाला फोन करून माझ्या विरोधात भूमिका का घेतली असा जाब विचारला. हा वाद एवढ्यावरच न राहाता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यापर्यंत गेला. अखेर भाजपाच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आजची होणारी मुख्यसभा तहकूब करून या वादावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आपल्याच पक्षातील अशी भांडणे पाहून त्यांनीही डोक्याला हात मारून घेतला.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com