भुजबळांची ती भूमिका वैयक्तिक; अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

Chhagan Bhujbal |Ajit Pawar| 'फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असं वक्तव्य केलं होतं.
Ajit Pawar|Chhagan Bhujbal |
Ajit Pawar|Chhagan Bhujbal |

पुणे : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री छगन भूजबळ यांनी ''फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असं वक्तव्य केलं होतं. त्यांंच्या या वक्तव्याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता, हे भुजबळांचं वैयक्तिक मत आहे. ही पक्षाची भूमिका नाही,' असा खुलासा केला आहे. आज पुण्यात एका कार्यक्रमातनंतर बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

छगन भुजबळ यांचं ते वैयक्तिक वक्तव्य आहे. असं पक्षाने आधीच सांगितलं आहे. प्रत्येकाला स्वत:ची भूमिका मांडण्याच अधिकार आहे. पण पक्षाने ती भूमिका घेतलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडली, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर, महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण मुंडकं खाणारा डायनासॉर होता, अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली असल्याचं विचारल्यावर, आपण असल्या फालतू टीकांना मी महत्व देत नाही, अशा शब्दांत सत्तांराची टीकेला धुडावलं आहे.

Ajit Pawar|Chhagan Bhujbal |
‘आयएएस’ आधिकाऱ्यांच्या बहुप्रतिक्षित बदल्यांमध्ये ‘शिंदेराज’ची प्रचिती

पीएफआयवर बोलताना ते म्हणाले की, देशात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर सक्त कारवाई झाली पाहिजे. भारतात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देण्याचा कोणालाही अधिकार नाही. जर तसं झालं असेल तर त्यांच्यावर सक्त कारवाई व्हायला पाहिजे की पुन्हा कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे अशा घोषणा देण्याची. पण राज्य सरकार केवळ आमचा तपास सुरु आहे, असं म्हणत आहे. पण तपासाला इतका वेळ लावायची काहीच गरज नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com