मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच अनुभवला 'पुणेरी' हिसका...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यान (Eknath Shinde) असे नाव दिलेल्या या उद्यानाचे उदघाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते आज होणार होते.
CM Eknath  Shinde|
CM Eknath Shinde| Sarkarnama

पुणे : माझे नाव दिलेल्या कोणत्याही उदघाटनाच्या कार्यक्रमाला मी जात नाही, असे सांगत पुण्यातील हडपसरच्या उद्यानाला धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचे नाव देण्याचे आमच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे, असा खुलासा करीत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पुण्यात केला.

CM Eknath  Shinde|
जिल्हा बॅंकेचे बडे थकबाकीदार राजेंद्र राऊतांच्या रडारवर; ‘आर्यन शुगरची येणेबाकी सोपलांकडून वसूल करणार का?'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यान असे नाव दिलेल्या या उद्यानाचे उदघाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते आज होणार होते. मात्र, यावर टीका सुरू झाल्यानंतर ‘यू टर्न’ घेत या उद्यानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री शिंदे यांनी रद्द केला. त्यावर विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘ माझ्या कार्यकर्त्याने उदघाटनाचा कार्यक्रम ठेवला होता. उद्यानाला माझे नाव आहे याची माहिती मला नव्हती. त्यामुळे या कार्यक्रमाला जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. माझ्या नावाने असलेल्या कार्यक्रमाला मी कधीच जात नाही. या उद्यानाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याचे आता जाहीर करण्यात आले आहे.’’

CM Eknath  Shinde|
आमदार वंजारी म्हणाले, ‘ती’ चर्चा आम्हाला नेहमीच ऐकायला मिळते !

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘ पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील पावसाने झालेल्या नुकसानीचा तसेच विकासकामांचा आढावा घेतला. गेल्या महिनाभरात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. पेट्रो,-डिझलचे दर कमी केले. विजेचा दर प्रतियुनिट एक रूपयाने कमी केला. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसात अनेक निर्णय तातडीने घेतले आहेत. राज्याचा दौरा सुरू आहे. सर्व ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.लोकांची कामे तातडीने मार्गी लागत असल्याने लोक आमच्याकडे मोठ्या अपेक्षेने येत आहेत.’’

CM Eknath  Shinde|
CM शिंदेंनी कार्यकर्त्यांना आवरावं; फडणवीसांना असं वागतांना कधी बघितले नाही : अजित पवार

मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे स्पष्ट करून राज्यातील विकासाच्या कामांना गती देण्यास आमचे प्राधान्य राहील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घरात सापडलेल्या साडेअकरा लाख रूपयांपैकी दहा लाख रूपयांच्या बंडलवर एकनाथ शिंदे आयोध्या दौरा असे लिहिल्याचे सापडले आहे. त्यावर विचारल्यानंतर मुख्मंत्री शिंदे म्हणाले, ‘‘ पैसे त्यांच्या घरी सापडले आहेत. त्यामुळे कुणाचे नाव लिहिले हे त्यांना विचारा. मी त्यावर काय सांगणार.’’

पाटण्याहून येणाऱ्या विमानाला मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे उशीर झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.पंधरा दिवसांपूर्वीची ही घटना आहे. त्यावर विचारले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी खुलासा केला. गॅसचा स्फोट होऊन सातारा जिल्ह्यातील एका कुटुंबातील दोन मुले भाजली होती. त्यांना तातडीने पुणे-किंवा मुंबईत उपचारासाठी आणायचे होते. आणखी एका रूग्णाला लिलावती रूग्णालयात आणायचे होते.त्यासाठी फोन केला होता. तो फोन केल्यामुळे या तीन रूग्णांचा जीव वाचला. त्यासाठी विमान थांबवल्याचा खुलासा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com